
माजी आम.अरविंद पाटील यांचे ते वाहन चालक!
त्याच्या निधनाने तालुक्यात हळहळ!
खानापूर प्रतिनिधी
मुळचे मेरडा (ता.खानापूर ) गावचे रहिवाशी व माजी आमदार व डी सी सी बॅकेचे संचालक अरविंद पाटील यांचे वाहन चालक संतोष परशराम मादार (वय ४५) हे शनिवारी रात्री ११ वाजता दुचाकी वरून मेरडा गावाकडे जात होते.
नागरगाळी कटकोळ या मार्गावरील हलशी इंदिरानंगर कन्नड शाळेच्या समोर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने संतोष खड्ड्यात कोसळला व त्याच्या डोक्याला गंभीर जखमी झाला.
रात्रीच्यावेळी रस्त्यावर पडलेल्या संतोषला कोणीच पाहिले नाही.त्यामुळे तो विव्हळत पडला .त्यातच तो रक्तबंबाळ झाला. रात्रा चार वाजण्याच्या सुमारास एक वाहन त्याच रस्त्याने जात असताना आपघातात जखमी झालेला दृष्य त्याना दिसले .लागलीच त्यानी आरोग्य कवच फोन करून बोलावून खानापूर येथील सरकारी दवाखाण्यात दाखल करण्यात आले . पण पुढील उपचारासाठी केएलई येथे दाखल करण्यात आला पण उपचाराचा उपयोग झाला नाही.त्यातच सोमवारी रात्री आठच्या सुमारास उपचार दरम्यान मृत्यू झाला.
संतोष च्या पश्चात वडील ,पत्नी ,मुलगा,मुलगी असा परिवार आहे.