
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
३२ वर्षे विज्ञान शिक्षकीसेवा !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
मराठा मंडळ संस्थेच्या खानापूर ताराराणी हायस्कूलचे विज्ञान शिक्षक संजीव गणेश वाटूपकर यांच्या सपत्नीक सेवा निवृत्तीनिमित्त शुक्रवारी दि .१३ रोजी सदिच्छा समारंभ हायस्कूलच्या सभागृहात पार पडला.
सदिच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव.तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव पाटील संचालक,मराठा मंडळ बेळगाव व प्राचार्य ए एल पाटील ,विद्यार्थीनी प्रतिनिधी प्रणाली जांबोटकर आदी उपस्थित होते.
यावेळी सत्कारमुर्ती संजीव वाटूपकर याचा सपत्नीक सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून डाॅ.सरिता मोटराचे (गुरव ) ( यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी) या उपस्थित होत्या.
प्रास्ताविक व सत्कारमुर्तीचा परिचय बी एस मन्नोळकर यानी केले. तर मुख्याध्यापक राहुल जाधव यानी उपस्थिताना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.
यावेळी सत्कारमुर्ती संजीव वाटूपकर यांचा सपत्नीक सत्कार ताराराणी हायस्कूलच्यावतीने मानचिन्ह,शाल पुष्पहार व भेटवस्तू देऊन करण्यात आला. तसेच ताराराणी काॅलेज,खानापूर मराठा मंडळ हायस्कूल, करंबळ हायस्कूल ,बेकवाड हायस्कूल ,कापोली हायस्कूल,कुप्पटगिरी हायस्कूल, आदी हायस्कूलच्यावतीने तसेच निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक ,मित्र मंडळाच्यावतीने शाल ,पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख वक्त्या डाॅ. सरीता मोटराचे म्हणाल्या की शिक्षकाचे विद्यार्थ्यांच्या मनात जे आदराचे स्थान असते.तोच मोठा आदर्श शिक्षकाचा मान असतो. हा आदर्श आजच्या सत्कारमुर्ती संजीव वाटूपकर याना मिळाला आहे.विज्ञानाचा शिक्षक असुन त्यानी साहित्य क्षेत्रात मोठी भरारी मारली आहे.
त्यांच्या अंगचे गुण विद्यार्थ्यीनीनी आत्मसात करावे. असे सांगुन सत्कारमुर्तीच्या कार्याचे गुणगान सांगीतले.
यावेळी सत्कार मुर्ती संजीव वाटूपकर म्हणाले की मी विज्ञान शिक्षका पेक्षा साहित्याकडे जास्त वळलो. त्यामुळे साहित्याची आवड असल्याने कविता लिहीलो.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करण्यात जास्त रस असल्याने विज्ञान शिक्षकापेक्षा साहित्याची आवड जास्त होती.
यावेळी ते म्हणाले की मार्गदर्शक म्हणून मी जास्त चांगला आहे.शिक्षक म्हणून नाही. असे सांगुन शिक्षक शिकवितात म्हणून विद्यार्थी घडतात.असे नसुन विद्यार्थी शिकतात.म्हणून ते घडतात .असे मत व्यक्त केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना मुख्याध्यापक राहुल जाधव म्हणाले की, सत्कारमुर्ती संजीव वाटूपकर हे आमचे चांगले मार्गदर्शक होते.त्यानी हायस्कूलमध्ये राहुन योग्य मार्गदर्शन करून आम्हाला सहकार्य केले ते कधीच विसरणार नाही.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ मंगला पाटील यानी केले तर आभार एल आर पाटील यानी मानले.