
#खानापूर तालुक्यात वनखाते आजुन किती जनावरांचा बळी घेणार!
#खैरवाड,हडलगा,भागातही बिबट्याने बकरी,कुत्र्यांचा फडशा पाडला!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात जंगली प्राण्याकडुन वारंवार पाळीव जनावरांच्या हल्ले होत आहेत. त्यात गरीब शेतकर्याचे आतोनात नुकसान होत आहे. याकडे वनखाते डोळे झाक करत आहेत.
काही दिवसापूर्वी खैरवाड,हडलगा भागात बिबट्याकडुन बकर्या ,कुत्र्याचा फडशा पाडला.
या घटना ताज्या असतानाच शनिवारी कारलगा (ता.खानापूर )येथूल शेतकरी अशोक मारूती पाटील हे जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या शिवारात रेडकाला बांधुन भात कापणी करताना असताना दुपारच्यावेळी जंगली प्राण्याने रेडका फडशा पाडुन रक्तबंबाळ करून ठार केले.
शेतकरी भात कापणीच्या कामात असल्याने लक्ष गेले नाही.दुपारी जेवणाच्यावेळेत जाऊण प्रत्यक्ष पाहिले असता रेडकू रक्तबंबाळ अवस्थेत दिसले. एखादा जंगली प्राण्याने हल्ला केल्याचे सशंय व्यक्त करण्यात आला.
याबाबत वनखात्याला माहिती देण्यात आली.
जंगली प्राण्याच्या हल्ल्यात रेडकू दगावल्याने शेतकर्याचे नुकसान झाले आहे.
खैरवाड,हडलगा भागात बिबट्याच्या हल्यात बकरी ,कुत्री ठार झाली आहेत.
या घटना ताज्या असताना कारलगा भागातील घटनेने शेतकर्याची झोप उडाली आहे.
तेव्हा वनखात्याने जंगली प्राण्याचा बंदोबस्त करावा.तसेच लोकप्रतिनिधीनी वनखात्याला हत्ती,बिबट्या सारख्या प्राण्यावर लक्ष ठेवून शेतकर्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावे.अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.