
गणेशोत्सव मंडळाची मागणी.
गणेशोत्सव -ईद मिलद शांतता बैठक संपन्न!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
गणेशोत्सव काळात ग्रामिण भागात नोकरवर्ग येतात.त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करताना, तसेच स्थानीक दुचाकीवाहन धारक उत्सव काळात कामानिमित्त येजा करतात. नंदगड मार्गावर, अथवा गणेबैल महामार्गावर पोलिस दुचाकी स्वाराना आडवुन नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी नाहक त्रास देतात.निधान गणेशोत्सव काळात पोलिसाचा ससेमिरा थांबवावा.अशी मागणी सार्वजिनिक गणेशोत्सव मंडळांच्यावतीने शुक्रवारी ता.प.सभागृहात पार पडलेल्या गणेशोत्सव -ईद ए मिलाद शांतता बैठकीत केली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस उपाध्यक्ष रवि नायक होते.
व्यासपीठावर तहसीलदार प्रकाश गायकवाड ,उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक, चिफा आँफिसर संतोष कुरबेट आदी उपस्थित होते.
याप्रास्ताविक व स्वागत उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यानी केले.
हिंदू,मुसलमान समाजाचे गणेशोत्सव व ईद ए मिलाद सन शांततेत पार पाडावा.यावेळी पोलिस खात्याचे व इतरांचे सहकार्य नक्कीच मिळेल.
कायदा व सुव्यवस्था याला बाद येणार नाही .हे लक्षात घेऊन सन आंनदाने साजरा करा.असे आवाहन जिल्हा पोलिस उपाध्यक्ष रवि नायक यानी बोलताना आवाहन केले.
यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक म्हणाले की गणोशोत्सव मंडळासाठी आवश्यक असणार्या परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली असुन गरज असलेल्या परवानगी तातडीने देण्यात येतील , डाॅल्बीचा वापर करण्यात येऊ नये.याचा त्रास भाविकाना होणार नाही.याची जातीने दक्षता घ्यावी .
गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणूक योग्य वेळेत पार पाडावी. मंडपात सीसीटीव्हीचे नियोजन ,रूग्णवाहिकाचे नियोजन करण्यात यावे.
विसर्जन मिरवणूकीत गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
गणेश विसर्जना दिवशीच ईद ए मिलाद असल्याने दोन्ही धर्माच्या नागरीकानी आपले सन साजरे करावे.
यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यानी मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस खाते, हेस्काॅम तसेच नगरपंचायत आदीचे गणेश मंडळाना सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले.
गणेश मंडळाचे पदाधिकारी पंडित ओगले, अमृत पाटील, रवी काडगी, व इतर पदाधिकार्यानी विचार व्यक्त केले.
बैठकीला विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.