
#बसवजय मृत्यूंजय महास्वामी!
#पारिश्वाडात जनजागृती सभा.
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
लिंगायत समाजाला २ ए आरक्ष मिळविण्यासह इतर मागण्यासाठी येत्या १० डिसेंबर रोजी बेळगावं सुवर्णसौध परिसरात लिंगायत समाज बांधवांच्या उपस्थित आंदोलन छेडण्यात येनार आहे.तेव्हा खानापूर तालुक्यातुन २५ हजार हुन जास्त लि़गायत समाजबांधवानी आंजोलनात सहभागी होण्याचे आवाहन कुडलसंगम ट्रस्टचे अध्यक्ष प्रथम जगदगुरू बसवजय मृत्यूजंय महास्वामी यांनी केले.
पारिश्वाड येथील लिंगायत समाज बांधवाच्या जनजागृती सभेत ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, लिंगायत समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सतत लढा दिला. परंतु सरकार याची दखल घेत नाही.
यापूर्वी भाजप सरकारने दखल घेतली होती.
मात्र विद्यामान सरकार याकडे लक्ष देत नाही. यासाठी सरकारला जागे करण्यासाठी लढा तीव्र करणे गरजे आहे.असे सा़गीतले.
प्रांरभी संगमेश वाली यानी उपस्थितांचे स्वागत करून सभेचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी सभेला अशोक यमकनमर्डी,बसवराज कुकडीकर,आडवेश इटगी, खानापूर तालुका काॅग्रेस शहर अध्यक्ष श्री राऊत व इतर लिंगायत नेते मंडळी तसेच लिंगायत समाजाचे कार्यकरर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.