
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
उचवडे ( ता.खानापूर ) येथील रहिवाशी व जांबोटी माजी जिल्हा पंचायत सदस्य ,खानापूर तालुका कुस्ती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे यांच्या धर्मपत्नी व बैलुर ग्राम पंचायतीच्या माजी अध्यक्षा व विद्यामान सदस्या अनुसया लक्ष्मण बामणे ( वय ४६ ) यांचे रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,दोन चिरंजीव,एक कन्या असा परिवार आहे.
बैलुर ग्राम पंचायतीच्या अध्यक्षा म्हणून त्यानी आडीज वर्षाचा काळा सांभाळला.तर सध्या विद्यामान सदस्या म्हणून कार्यरत होत्या.
जांबोटी माजी जिल्हा पंचायत सदस्य व खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचा महत्वाचा वाटा होता.
रात्री त्याना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांच्या मृत्यू झाला.