
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
माळअंकले (ता. खानापूर ) येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा रविवारी दि.२० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे उपस्थित राहणार आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन आमदार विठ्ठलराव हलगेकर ,माजी आमदार अरविंद पाटील यांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी दीपप्रज्वलन माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर,माजी दिगंबर पाटील,भाजपा कार्यकर्त्या सौ. धनश्री सरदेसाई, जिल्हाशिक्षणाधिकारी श्रीमती लिलावती हिरेमठ,तहसीलदार दुड्डापा कोमार,बीईओ पी.रामाप्पा,पीएसआय एम बी बिरादार, पीएलडी बॅक चेअरमन मुरलीधर पाटील,भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,माजी जि.प सदस्य विलास बेळगावकर,सामाजिक कार्यकर्ते भरमाणी पाटील,समिती कार्याध्यक्ष गोपाळ पाटील आदीच्याहस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.मधुकर पाटील मा.सिनेट शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर, हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते देवदेवतांच्या फोटोचे पुजन करण्यात येणार आहे.तर कार्यक्रमाला विविधमान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
# दुपारी १ ते ३ भोजन व विश्रांती!
दुसर्या सत्रात आजी माजी एस डी एम सी अध्यक्ष,सदस्याचा सत्कार,
तर सायंकाळी सहा वाजता अभिजीत कालेकर (खानापूर) प्रस्तुत शालेय विद्यार्थ्याचा बहारदार नृत्यू व श्री छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्यभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्वानी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा सुधारणा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.