
#पाहुण्यांच्याहस्ते फित कापून केले लोकार्पण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
डुक्करवाडी (फुलोवाडी) ( ता.खानापूर) येथील जिर्णोध्दार केलेल्या खुटी माऊली मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवारी दि.१६ रोजी सकाळी १० वाजता उपस्थित पाहुण्याच्याहस्ते फित कापून करण्यात आला .
प्रारंभी कळसारोहण पीरयोगी सारगनाथ कारभारी महाराज कुंभार्डा यांच्याहस्ते करण्यात आले.
मंदिराचा लोकार्पण सोहळा उपस्थित पाहुण्याच्याहस्ते तर गाभारा लोकार्पण सोहळा मारूती कुंभार यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नाना पाटील होते.
तर दिपप्रज्वलन प्रमोद कोचेरी, के.पी पाटील आदीच्या हस्ते करण्यात आले.
विविध फोटोचे पुजन हलकर्णी ग्रा पं उपाध्यक्षा सौ उज्वला भैरू कुंबार,वसंत कुंभार आदीच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन एम डी सदानंद पाटील, राजू पाटील,बबन अल्लोळकर ,नामदेव गुरव,गुंडू तोपिनकट्टी व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माजी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल म्हणाले की, मंदिरे गावचे भूषण आहे. मंदिरामुळे गावात शांतता व भक्तीची ओढ निर्माण होते.तेव्हा गावकर्यानी मंदिराची जोपसना ,स्वच्छता व पुजाआर्चा नियमित करावी.असे आवाहन केले.
कार्यक्रमाला गावचे नागरीक ,श्रीखुटीमाऊली पंचकमिटी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ अध्यक्ष भैरू कुंभार यानी मानले.
शुक्रवारी दि २० रोजी खुटी माऊली यात्रा होणार आहे.