“बोगस दुबार मतदारांची नावे वगळणार,विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेस सर्वानी सहकार्य करावे.”
आम.हलगेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात मतदार यादी शुध्दीकरण तसेच अद्ययावतीकरणाची व्यापक मोहिम भारत निवडणुक विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण ( एसआयआर) कार्यक्रमांतर्गत सुरू आहे.
यावेळी बी एल ओ अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी कर मार आहेत.तेव्हा नागरीकानी योग्य माहिती देऊन त्याना सहकार्य करावे.असे आवाहन आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी गुरूवारी दि.२ रोजी खानापूर भाजप कार्यालयात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना केेले.
यावेळी पत्रकार परिषदेला भाजप राज्य कार्यकरणी सदस्य प्रमोद कोचेरी, माजी आमदार अरविंद पाटील,भाजप नेत्या धनश्री सरदेसाई,जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल,माजी जिल्हा पंचायत सदस्य जोतिबा रेमाणी, बाबूराव देसाई,रयत मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व एम डी.सदानंदन पाटील,अँड.चेतन मणेरीकर,आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रधानकार्यदर्शी मल्लापा मारीहाळ यानी प्रास्ताविक केले.
भाजप नेत्या सौ धनश्री सरदेसाई म्हणाल्या कि,तालुक्याच्या काही भागात वांदरमारी, हक्की फक्की तसेच आदीवासी समाजाला मतदार यादीत नाव सामाविष्ठ करण्यासाठी ओळख पत्र मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे.
यावेळी बोलताना प्रमोद कोचेरी म्हणाले की,तालुक्याच्या कणकुंबी, चोर्ला, पारवाड,जांबोटी,हेमाडगा खेड्यातील अनेक नागरीक कामासाठी महाराष्ट्र, गोवा राज्यात वास्तव्यास आहेत.त्यानी आपल्या मुळगावातील मतदार यादीत नाव ठेवावे,यासाठी बी एल ओ अधिकारी घरोघरी भेट देणार आहेत.
तर मा जी आमदार अरविंद पाटील यानी बुथ प्रमुखांची मतदान केद्रावर नियुक्ति करून जनजागृती सुरू करत असल्याचे सांगीतले.तसेच बोगस व परप्रांतीय मतदाराची नावे तपासुन वगळण्याची आवशकता असल्याचे सांगीतले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सानीकोप, संजय कुबल, अँड चेतन मणेरीकर यानी ही नागरीकानी जातीने लक्ष देऊन मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन केले.
