
खानापूर तालुका भाजप ,काॅग्रेस अध्यक्ष वर्ग मित्रच!
संदेश क्रांती न्यूज :
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सध्या खानापूर तालुक्यात केवळ राष्ट्रीय पक्षाचे वर्चस्व दिसुन येत आहे.त्यामुळे प्रत्येक जन राष्ट्रीय पक्षाकडे वळला आहे.म्हणून तालुक्यात राष्ट्रीय पक्षाला महत्व आले.यात केवळ राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष व दुसरा काॅग्रेस पक्ष.
दोन्ही राष्ट्रीय पक्षाचे तालुका अध्यक्ष वर्ग मित्रच!
खानापूर तालुका भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल व काॅग्रेस ब्लाॅक तालुका महादेव कोळी हे दोघे वर्ग मित्र आहेत.
दोघा वर्गमित्रानी खानापूर तालुक्याचे आपापल्या पक्षाचे अध्यक्ष पद गेल्या अनेक वर्षापासुन सांभाळत आहेत.
आता दोन्हीही राष्ट्रीय पक्षाच्या तालुका अध्यक्षाच्या बदलीचे संकेत!
खानापूर तालुक्याच्या राष्ट्रीय पक्षाच्या भाजप व काॅग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अनेक वर्षापासुन कार्यरत आहेत.आता खानापूर तालुका बीजेपी अध्यक्ष संजय कुबल व काॅग्रेस ब्लाॅक अध्यक्ष महादेव कोळी याच्या अध्यक्ष पदाच्या बदलीचे संकेत असुन दोन्ही राष्ट्रीय पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदे बदलण्याची चर्चा तालुक्यात मोठ्याने चर्चा सुरू आहे.
नविन अध्यक्षपदासाठी अनेकजन उत्सुक!
खानापूर तालुक्यात दोन्ही राष्ट्रीय पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदाच्या नव्या चेहराची गरज आहे. अशी मागणी कार्यकर्त्यातुन होत आहे.
खानापूर तालुका भाजप पक्षामध्ये नुतन तालुका अध्यक्ष पदासाठी डजनभर उत्सुक आहेत. मात्र खानापूर तालुका हा मराठी भाषिक तालुका म्हणून ओळखला जातो.
त्यामुळे तालुक्यात ८० टक्के मराठी भाषिक आहेत .तर केवळ २० टक्के कन्नड भाषिक त्यामुळे तालुक्यात मराठी भाषिकच पक्षाचा तालुका अध्यक्ष महत्वाचे आहे.
तर पक्षाला बळकटी येणार अन्यथा मराठी भाषिक कार्यकर्त्यावर अन्याय झाला. पक्षाला अनेक समस्याना सामोरे जावे लागणार यात संशय नाही.
खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष पद हे सुध्दा मराठी भाषिक कार्यकर्त्याला देणे गरजे आहे.
कारण अलिकडे महाराष्ट्र एकिकरण समितीचे जेष्ठ कार्यकर्ते सुध्दा काॅग्रेसमध्ये सामिल झाले आहे.खानापूर तालुका काॅग्रेस पक्षात कार्यकर्त्याची संख्या दिवसेदिवस वाढत आहे.काॅग्रेस पक्षाला ही बळकटी आली आहे.
तेव्हा या ही पक्षाने मराठी भाषिक कार्यकर्त्याला तालुका अध्यक्ष पदाची धुरा दिली .तर नक्कीच काॅग्रेसपक्षाला चांगले दिवस येथील व भविष्यात पुन्हा एकदा काॅग्रेसचा आमदार होण्यास वेळ लागणार नाही.
तालुक्यात राष्ट्रीय पक्षाचे बळ वाढणार!
खानापूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासुन महाराष्ट्र एकिकरण समितीचा बाल्ले किल्ला म्हणून बघितले जात होते.
मात्र आता महाराष्ट्र एकिकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते राष्ट्रीय पक्षाकडे वळल्याने समितीला बळकटी आली नाही.त्याचाच फायदा राष्ट्रीय पक्षाने घेतला.त्यामुळे राष्ट्रीय पक्षाला बळकटी आली. आज खानापूर तालुक्यात भाजप व काॅग्रेस हे दोनच राष्ट्रीय पक्ष पुढे आले आहेत.