
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीचे शिष्ठमंडळ बेळगाव येथील युवा समितीने रविवार दि. १२ जानेवारी रोजी बेळगांव येथे आयोजित युवा आघाडी मेळाव्यामध्ये उपस्थिती दर्शवुन महाराष्ट्राचे दिवंगत नेते कै. आर. आर. पाटील यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांची भेट घेतली. यावेळी सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा करण्यात आली, नामदार कै. आर. आर. पाटील यांनी सीमाप्रश्नी विशेष योगदान दिले होते, बेळगांव येथे २००६ मध्ये झालेल्या मेळाव्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आपणही त्याच जोमाने सीमा वासियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी त्यांनी ग्वाही दिली. याप्रसंगी खानापूर तालुक्याचे माजी आमदार दिगंबरराव पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, मध्यवर्ती म ए समितीचे सदस्य गोपाळराव पाटील, यशवंतराव पाटील, सागर पाटील, संतोष पाटील, विजय पाटील (गर्लगुंजी) व अन्य समितीनेते उपस्थित होते.