संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
रामगुरवाडी ( ता.खानापूर ) येथे डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून खानापूर येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे, प्रत्येकाच्या “घराघरात आणि मनामनात” डॉ. बाबासाहेब आंबेडकर...या अभियानाचा प्रारंभ झाला.
आंबेडकरांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे, समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक, प्रा. के. एन. कांबळे यांनी आंबेडकरांचे जीवन, कर्तृत्व आणि शिक्षण यावर विचार व्यक्त केले. इंग्रजीच्या प्राध्यापिका, डॉ. विजयालक्ष्मी तिर्लापूर यांनी आंबेडकरांची समाजसेवा आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठीचा त्यांचा संघर्ष याविषयी त्यांनी विचार व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या, प्रा. जे. बी. अंची यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी प्रत्येकाच्या “घराघरात आणि मनामनात” डॉ. बाबासाहेब आंबेडकर...या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांना समजावून सांगितला
कार्यक्रमाची सुरवात कु.पोर्णिमा इंगळे आणि तिच्या सहकार्याच्या सुमधुर गीताने झाली. स्वागत व प्रास्ताविक कु. परशराम लोकोळकर यांने केले. सूत्रसंचालन एन एस. एस अधिकारी डॉ. सुनंदा कुरनी यांनी केले. जनरल सेक्रेटरी कु. स्नेहल कोळी हिने आभार व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग विद्यार्थी वर्ग बहूसंख्येने उपस्थित होता.
