संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ११ ते १७ एप्रिल दरम्यान रामागुरुवाडी गावात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) शिबिराचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन नुकताच संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. जे. बी. अंची होत्या तर उद्घाटक म्हणून मराठा मंडळ संस्थेचे संचालक श्री. परशुरामअण्णा गुरव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रामगुरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. आर. भोसले, डॉ. विजयालक्ष्मी तिर्लापूर उपस्थित होत्या. या कार्यक्रमात युवा पिढीला उद्देशून विविध मान्यवारांनी मार्गदर्शन केले. एन एस. एस अधिकारी डॉ. सुनंदा कुरनी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर विद्यार्थिनी स्नेहल कोळी हिने आभार व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग विद्यार्थी वर्ग बहू संख्येने उपस्थित होता.
