संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
बिडी ( ता. खानापूर ) येथील जी.ई.सोसायटी संचलित. नेहरू मेमोरियल संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाचा द्वितीय पी.यू.सी. निकाल ८१% लागला असून, वाणिज्य विभागाचा निकाल १००% लागला आहे. विशेष म्हणजे वाणिज्य (कॉमर्स) विभागाचा निकाल सलग सात वर्षांपासून शंभर टक्के होत असून, पाच विषयांचा निकालही शंभर टक्के लागला आहे.
दोन विद्यार्थी विशेष श्रेणीत तर १९ विद्या र्थी प्रथम श्रेणीत ९ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर उर्वरित विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कु. ऐश्वर्या हीरेगौड आणि ऋतुजा वड्डर या दोघी ९०.५ % गुण मिळवून काॅलेजमध्ये प्रथम तर कु कलमेश कारकद ८९.६६% द्वितीय कु वैष्णवी खैरवाडकर ८९.३३ तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी विद्यार्थीनीं कोणत्याही कोचिंग क्लासेस अथवा बाहेरील शिकवणीला न जाता इतक्या उत्तम श्रेणीनत यश संपादन केले असून. काॅलेजमध्ये अनुभवी व होतकरू प्राध्यापक, प्राध्यापिका असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत मार्गदर्शन आणि परिश्रम घेणारा प्राध्यापक वर्ग. विद्यार्थ्यांची वैयक्तीक विचारपूस आणि काळजीवाहू प्राध्यापक असल्याने फक्त शिक्षणातच नाही तर शारिरीक आणि सांस्कृतिक स्पर्धांनंमध्ये सुध्दा जिल्हा पातळी पर्यंत वेगळी चमक दाखवून दिली आहे.
या संस्थेचे अध्यक्ष महेश बिडीकर, कार्यदर्शी गणू कुलकर्णी, अध्यक्ष डॉ. जी.व्ही.जवळी व संचालक मंडळ तसेच प्राचार्य एल.पी.पाटील आणि प्राध्यापक वर्गाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी- विद्यार्थीनींनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल परिसरातून तसेच खानापूर तालुक्यातुन सर्वांचे कौतुक होत आहे.
