उन्हाळ्यातील वायंगन भात पिक वाया जाण्याची भिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा जंगलाने व्यापलेला तालुका आहे.या तालुक्यात वर्ष,भर हत्तीकडुन पिकांचे नुकसान सुरूच आहे.
असे असताना गेल्या तीन दिवसापासुन जामगाव ( ता. खानापूर) गावच्या शिवा रात उन्हाऴ्यात घेण्यात येत असलेले वायंगण भाताचे प्रचंड नुकसान होत आहे.
तालुक्याच्या जामगाव, कोंगळा,अबनाळी, तसेच कबनाळी, नेरसा,निलावडे,याभागात पाण्याचा मुबलक साठा असल्याने तसेच भांडुरा व म्हादाई नदीचे पाणी असल्याने पावसाळ्यासह उन्हाळ्यात शेतकरी पिके घेतात.
याभागात उन्हाळ्यात वायंगण भात पिक, मिरची तसेच ऊस पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.
याहिरव्यागार पिकामुळे याभागातील हत्ती ठाण मांडुन बसला आहे.कोगळा भागात भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केल्यानंतर गेल्या दोन दिवसात जामगाव गावच्या शिवारातील मनोहर सुखये,लक्ष्मण सुखये, बालकृष्ण सुखये यांच्या मालकीच्या वायंगण भाताचे प्रचंड नुकसान केले आहे.
हत्ती बरोबर गव्यारेड्याकडुन भात पिकांचे नुकसान होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते आनंद गावडे यांची प्रतिक्रिया!
यावेळी बोलताना जामगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते आनंद गावडे म्हणाले की, गेले किती दिवस हत्तींचा या पश्चिम भागाला वावर होत आहे. कित्येक लोकांच्या शेतांचे नुकसान झालेले आहे .तरी वन विभाग याच्यावर निर्णय घ्यायला काही हालचाल करत नाही जामगाव कोगळा पास्टोली कबनाळी गव्हाळी , नेरसे या भागातील गेले दोन महिन्यापासून ह्या लोकांच्या पिकांचे भरपूर नुकसान होत आहे. तरी या वनखात्याकडुन काही या हत्तीवर बंदोबस्त होत नाही . कारण भात पीकाचे नुकसान झाले तर लोकांनी कशे पोट भरावे असा हा प्रश्न पडला आहे .इकडच्या भागात काही काम धंदे नसल्यामुळे काही लोक कामा निमित्ताने गोवा महाराष्ट्रात जातात आणि गावाकडे राहिलेले लोक आपल्या काहीतरी आपल्या पोटापाण्यासाठी करण्यासाठी शेतीवाडी करतात तरी ह्या लोकांना खायच्या नशिबात नाही असे नुकसान होत आहे. वारंवार वनखात्याला विन्ंत्या अर्ज करून याच्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून ह्या नुकसान झालेले बाळकृष्ण सुकये लक्ष्मण सुखीये मनोहर सुकये यांना तातडीने वनखात्याने पंचनामा करून तातडीने मदत द्यावी मदत नाही दिली तर सर्व खेड्यातील लोक रस्त्यावर आंदोलन करण्यास तयार आहेत . असा इशारा वनखात्याला दिली आहे.तेव्हा तातडीने नुकसान भरपाई द्यावी .अशी मागणी भाजपा कार्यकर्ते आनंद गावडे यांनी केली आहे ,.

#ट्रिब्यूनल मेंबर विनायक मुतगेकर यांची प्रतिक्रिया !
यावेळी खानापूर ट्रिब्यूनल मेंबर विनायक मुतगेकर म्हणाले की, निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील शिवारात हत्तीनी आता पर्यत केलेल्या पिकांचे नुकसान पाहता,शेतकर्यानी आत्महत्या केल्यावाचुन पर्याय नाही.तरी सुध्दा संकटावर मात करत काबाट कष्ट करत जंगली प्राण्यानी केलेल्या नुकसानीतुन सावरत ते शेतकरीजीवन जगत आहे.
याचे वनखात्याला काहीच देने घेने नाही.लोकप्रतिनिधी वेळीच जाऊन कदी दखल घेत नाहीत.यामुळे याभागातील शेतकरी वैतागला आहे.मी सातत्याने वनखात्याला झालेल्या शेतकर्याच्या पिकाच्यानुकसानी बाबत आवाज उठवून नुकसान भरपाईची मागणी करत असतो.यापेक्षा वनखात्याने आपले जंगली प्राणी सांभाळावे.त्यांचा बंदोबस्त करावा.यासाठी मीसातत्याने मागणी करत आहे.