संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
किरावळे गुंजीक्राॅस ( ता. खानापूर ) येथील श्री गोरक्षनाथ मठ नूतन समाधी इमारतीचे उदघाटन व प्राण प्रतिष्ठाण सोहळा परम पूज्य गुरू गोरक्षनाथ यांच्या आशिर्वादाने तसेच भगवान शिव कृपाने रविवार दि .२९ व सोमवार दि. ३०रोजी सकाळी ११.३० वाजता होत आहे.
या वेळी कार्यक्रमाला राज योगी निर्मल नाथ जी-कजली ,पीर योगी रतन नाथजी जम्मू काश्मीर,राज गुरू श्रध्दा नाथ जी विठ्ठल मठ,पीर योगी गणेश नाथ जी त्र्यंबकेश्वर,पीर योगी पारस नाथ जी बत्तीस शिराळा मठ,पीर योगी मयंक नाथ जी दादा मठ,पीर योगी सिंगनाथजी बाला बाडी मठ,पीर योगी मोहन नाथ जी हाडी बडग मठ, पीर योगी शुकदेव नाथ जी चंद्र गुप्ती,पीर योगी दीपक नाथ जी कोल्हापुर,पीर योगी संगम नाथ जी साई खेडा,पीर योगी अजय नाथ जी परांडा,पीर योगी श्याम नाथ जी सो नि कि मेरू, पीर महंत योगी शिव नाथ जी सौंदत्ती,महंत सो मार जी मूदगड,महंत मंगल नाथ जी लोकी मठ,महंत मेघनाथ जी करल कटा,महंत छुनी नाथ करजणि,महंत भिष्मनाथ पुणे,महंत त्रीशूल नाथ कोडवा,महंत दीपक नाथ रामटेकडी पुणे,महंत भगवान नाथ गीवडी, महंत दिग्विजय नाथ आळंदी पुणे,महंत माया नाथ जी आळंदी,महंत तेज नाथ जी आळंदी,महंत नवमी नाथ जी आंळदी,महंत मौज नाथ जी तुळजा भवनी,महंत विश्व नाथ जी राहुता, महंत सेवा नाथ जी भ्रम पराडा,महंत संगम नाथ जी विशाल गणपती नगर, महंत निर्मल नाथ जी राशन नगर ,महंत रामेश्वर नाथ जी चौफुला,महंत लागमन नाथ जी केडगाव ,महंत रवि नाथ टेकडी मंजर, महंत ज्वाला नाथ आळेफाटा, महंत गणेश नाथ पुणे आदीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या वेळी धार्मिक कार्यक्रम रविवारी दि .२९ व सोमवारी दि.३० रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत धूनी पूजन ,गुरू वंदना, प्राण प्रतिष्ठा अनुष्ठान,रुद्र अभिषेक ,महा आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.
दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भाविकानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजकानी केले आहे.

