#शेतकर्यातुन समाधान !
ट्रिब्यनूल मेबर विनायक मुतगेकर यांच्या प्रयत्नाना यश!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या जंगल भागातील कबनाळी गावात मागील चार दिवसापासुन टी. सी. जळाल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्याने कबनाळी नागरीकाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.
सध्या कडक उन्हाळा सुरू आहे.कबनाळी भागात शेतकरी उन्हाळी मिरच्यांचे मोठ्या प्रमाणात पिक घेतात.उसाचे पिक मोठ्या प्रमाणित घेतात.सध्या उन्हाळी मिरचीच सर्वत्र लावण्यात आली आहे.नुकसान मिरचीला फुल पडत आहे.अशावेळी मागील चार दिवसापासुन पिकाना पाणीच नाही.त्यामुळे मिरचीचे पिक सुकून गेले आहे.उसाला ही पाणी पुरवठा बंद झाला आहे.त्यामुळे लाखो रूपये खर्चून शेतकर्यानी घेतलेल्य़ा पिकांचे भविष्य काय? असा प्रश्न शेतकर्याना पडला होता.
यासाठी कबनाळी भागाचे ग्राम पंचायत सदस्य, ट्रिब्यूनल मेंबर विनायक मुतगेकर याना खानापूर हेस्काॅम कार्यालयाला भेट देऊन सहाय्यक अभियंते एस पी अंगडी,व सेक्शन आँफिसर नागेश देवलतकर यांची भेट घेऊन कबनाळीच्या समस्या मांडल्या. लागलीच शनिवारी हेस्काॅम खात्याच्या कर्मचार्यानी कबनाळीत नविन टी. सी. बसवुन वीज़ पुरवठा सुरळीत केला.
या वेळी सहायक अभियंते व सेक्शन आँफिसर नागेश देवलतकर यानी नवीन टी सी देऊन लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल ग्राम पंचायत सदस्य व ट्रिब्यूनल मेंबर विनायक मुतगेकर.
कबनाळी गावचे शेतकरी राजाराम धुरी,लक्ष्मण धुरी,परशराम चौगुले,रामा चौगुले,अनंत गावकर आदी शेतकरीआदीनी समाधान व्यक्त केले.
