
#संगोळी रायणा वस्ती शाळेची रोहिणी पटोले ६२४ गुण घेऊन तालुक्यात प्रथम!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
सन २०२४-२५ सालचा दहावीचा निकाल लागला असुन खानापूर तालुक्याचा निकाल ६१.२ टक्के लागला असुन तालुक्यात संगोळी रायण्णा वस्ती शाळेची विद्यार्थीनी रोहिणी सिध्दू पटोले हिने ६२५ पैकी ६२४ गुण घेऊन तालुक्यत प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
तर लोंढा येथील मेडिलीन इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी क्षमा हेगडे हिने ६२५ पैकी ६२१ गुण घेऊन व्दितीय आली. तसेच बिडी होली क्राॅस स्कूलची विद्यार्थीनी रहिनीबानू हाजी हिने ६२५ पैकी ६१९ गुण घेऊन तृतीय आली.
तर संगाळी रायाणा स्कूलची वर्षा दौलती ६१८,याच स्कूलचा आदर्श महाले ६१४,होली क्राॅसचा प्रीतम शेट्टी ६१४ ,खानापूर उर्दू स्कूलची अन्हा तिगडी ६१३,संगोळी रायण्णा स्कूलचा विनोद कुरगुंद ६१२,मुगळीहाळ सरकारी स्कूलची रेणूका होलीकेरी ६१२ ,खानापूर मराठा मंडळ स्कूलचा चाळोबा आळवणी ६११ गुण घेऊन टाॅपटेन मध्ये सहभागी झाले आहेत.
खानापूर तालुक्यात ३४५१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.२११५ विद्यार्थी पास झाले.तर १३३६ विद्यार्थी नापास झाले. यंदा ही विद्यार्थीनीची निकालाची टक्केवारी वाढली आहे.