#शेतकर्याच्या पिकाचे होणार नुकसान!
#ट्रिब्यनूर मेबर विनायक मुतगेकर यानी घेतली अधिकार्याची भेट!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या जंगल भागातील कबनाळी गावात गेल्या चार दिवसापासुन टी. सी. जळाल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्याने कबनाळी नागरीकाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सध्या कडक उन्हाळा सुरू आहे.कबनाळी भागात शेतकरी उन्हाळी मिरच्यांचे मोठ्या प्रमाणात पिक घेतात.उसाचे पिक मोठ्या प्रमाणित घेतात.सध्या उन्हाळी मिरचीच सर्वत्र लावण्यात आली आहे.नुकताच मिरचीच्या झाडाना फुल पडत आहे.अशावेळी गेल्या चार दिवसापासुन पिकाना पाणीच नाही.त्यामुळे मिरचीचे पिक सुकून गेले आहे.उसाला ही पाणी पुरवठा बंद झाला आहे.त्यामुळे लाखो रूपये खर्चून शेतकर्यानी घेतलेल्य़ा पिकांचे भविष्य काय? असा प्रश्न शेतकर्याना पडला आहे.
आता पर्यत जंगली प्राण्याकडुन पिकाचे नुकसान झाले होते.!
कबनाळी परिसरात वर्षभर हत्तीकडुन पिकाचे नुकसान होत आहे.तरी ही शेतकरी उन्हाळ्यात मिरचीचे पिक घेऊन जगत असतानाच गेल्या चार दिवसापासुन टी सी जळाल्याने वीज पुरवठा बंद होऊन पिकाचे पाण्यावाचुन प्रचंड नुकसान होत आहे.
यासाठी कबनाळी भागाचे ग्राम पंचायत सदस्य, ट्रिब्यूनल मेंबर विनायक मुतगेकर यानी खानापूर हेस्काॅम कार्यालयाला भेट देऊन सहाय्यक अभियंते एस पी अंगडी,व सेक्शन आँफिसर नागेश देवलतकर यांची भेट घेऊन कबनाळीच्या समस्या मांडल्या. व वीज़ पुरवठा येत्या दोन दिवसात सुरळीत करा.अशी मागणी केली.
या वेळी सहायक अभियंते व सेक्शन आँफिसर नागेश देवलतकर यानी नवीन टी सी मागवुन लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिले.
या वेळी कबनाळीचे शेतकरी लक्ष्मण धुरी,परशराम चौगुले,रामा चौगुले,अनंत गावकर आदी शेतकरी उपस्थित होते.
