भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल
#श्री लिंग देव मंदिराचा चौकट पुजन सोहळा संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कबनाळी गावचा परिसर हा निसर्गरम्य परिसर आहे. अशा निसर्गरम्य वातावरणात श्री लिंगदेव मंदिर म्हणजे गावचे भूषण आहे.
या मंदिराची उभारणी झाल्याने कबनाळी गावाच्या नागरीकातुन भक्तीची ओढ लागेल.तेव्हा श्रीलिंग मंदिर हे मल प्रभा नदीपासुन जवळ असल्याने एक निसर्ग रम्य स्थळ म्हणून प्रसिद्धी मिळेल. तेव्हा या भागाचा काया पायलट होऊन गावचा भरभराट होवो. असे विचार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल यानी मंगळवारी कबनाळी गावात नूतन श्रीलिंग मंदिराच्या चौकट पुजन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीताराम राणे होते.चौकट पुजन माजी आमदार अरविंद पाटील व उपस्थित पाहुण्याच्याहस्ते करण्यात आले.
या वेळी बोलताना भाजपचे राज्य कार्यकारी सदस्य प्रमोद कोचेरी म्हणाले की, कबनाळी गावच्या निसर्गरम्य परिसरात श्रीलिंगदेव मंदिराच्या उभारणीने गावच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
दुसरीकडे कबनाळी गाव घनदाट जंगलात असल्याने जंगली प्राण्यापासुन नेहमीच नुकसानीच्या छायेत शेतकरी असतात . वर्षभर हत्तीकडुन पिकांचे नुकसान होत असल्याचे पाहत आहे.
तेव्हा हत्ती सारख्या प्राण्याकडुन नुकसान टाळण्यासाठी शासन दरबारी उपाय योजना राबविण्यासाठी प्रयत्न करू,हत्तीकडुन होणारे नुकसान टाळू असे सांगीतले.
या वेळी ट्रिब्यूनल मेबर विनायक मुतगेकर म्हणाले कि, कबनाळी गावच्या समस्या अनेक वर्षापासुन त्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी कबनाळी गावाने आमदार विठ्ठल हलगेकरांच्या कडुन एक पैसा गावाने घेतला नाही.मात्र याभागाचा ऊस लैला शुगर्सने सगळ्यात शेवटी उचलला.यात हत्तीकडुन किती नुकसान झाले सांगणेच कठीण आहे.
तालु क्या कबनाळी गावाने प्रामाणिकपणे मतदान केले मात्र गावच्या विकासाकडे आमदारानी साफ दुर्लक्ष केल्याचे ठपका ठेवत.य़ाभागात बोट दाखवुन विकास केल्याचे सांगावे असे आवाहन त्यानी केले.
यावेळी एम डी . सदानंद पाटील, अँड.ईश्वर घाडी, ग्राम पंचायत अध्यक्ष अरूण गावडे,,माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, वक्ते वासुदेव चौगुले आदीनी विचार मांडले.
यावेळी तालुका पंचायत सदस्य अशोक देसाई ,हभप विठोबा देसाई,ओमाणा नाईक,शंकर शास्त्री, राजाराम. धुरी,मुख्याध्यापक बापू दळवी,पीडीओ श्री. मोकाशी,सेक्रेटरी लक्ष्मण देसाई, य़ांच्यासह मुघवडे,कोकणवाडा,निलावडे,बांदेकरवाडा,आंबोळी,मळव,कांजळे,दारोळी,कापोली के सी,मुडगई आदी गावचे नागरिक मोटे या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम दळवी यानी केले.

