#शेतकर्यातुन भितीचे वातावरण!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कांजळे ( ता. खानापूर ) गावापासुन जवळ असलेल्या मलप्रभा नदीतील सर्वे नंबर १० या शेतात पाण्यासाठी वापरण्यात येणार्या पाण्याच्या मोटारीची व वायरींगची चोरी घडल्याचा प्रकार शनिवारी दि. २१ रोजी दुपारी २ वाजता भर दिवसा घडल्याने काजळे गावच्या शेतकर्यातुन भितीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी दि. २१ रोजी दुपारी पर्यत पाण्याची मोटर चालु होती.यावेळी भरदुपारी कोणच शेतकरी या भागात नव्हते .याचा फायदा घेऊन चोरट्यानी भर दुपारी मलप्रभा नदीतील पाण्याच्या मोटरीची चोरी केली.
या बाबत खानापूर पोलिस स्थानकात चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
खानापूर पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली असुन पोलिस चोरीचा शोध घेत आहेत.

