#विविध मान्यवरांचा ही सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता. खानापूर ) येथील श्रीमहालक्ष्मी हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. एस.आरगु हे दि. ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले.निमित्त शनिवारी दि.१४ फेब्रुवारी रोजी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
त्याचबरोबर आमदार विठ्ठल हलगेकर, आर. वाय.सुतार ,एस जी हिरेमठ, ए.जी.हिरेमठ, ए.जी.पाटील एस.पी.कुट्रे आदी मान्यवराचा सत्कार करण्यात येणार आहे.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमहालक्ष्मी शिक्षण संस्थेचे सेक्रेटऱी भैरू यल्लापा शहापूरकर हे उपस्थित राहणार आहेत.तर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून माजी महापौर व निवृत्त मुख्याध्यापक मालोजी अष्टेकर उपस्थित राहणार आहेत.तरी सर्वानी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमहालक्ष्मी हायस्कूलचे शिक्षकवृंद,आजी,माजी विद्यार्थी, संचालक मंडळ, माजी विद्यार्थी संघटना तोपिनकट्टी यानी केले आहे.
