शपथ ग्रहण समारंभात बेस्ट #परेड कमांडर,बेस्ट ड्रिल पुरस्काराने सन्मान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सिलिगुडी पश्चिम बंगाल येथे 31 जानेवारी रोजी झालेल्या B S F शपथ ग्रहण समारंभ संपन्न झाला .
त्यात मुळची ओलमनी ( ता.खानापूर )या गावची पण सध्या राहणार शाहूनगर कंग्राळी बी के गावची कन्या कु रोशनी वसंत मुळीक हिने 400 मुले आणि मुलीमध्ये परेड कंमांडर* लीड करण्याचा बहुमान मिळविला होता.
तसेच तिला या शपतग्रहण समारंभात बेस्ट परेड कमांडर , बेस्ट ड्रिल* पुरस्कार प्रदान करण्यात आले 400 मुलामुलीमध्ये तिने नारी शक्तीचा आवाज घुमविला या बद्दल तिला पुरस्कारही मिळाला होता. याचं औचित्य साधून मुळीक कुटुंबीयांनी रोशनी हीचा सत्कार समारंभ वसुंधरा मंगल कार्यालय शाहू नगर येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, युवा।समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे, कंग्राळी बी.के. ग्राम पंचायतीचे सदस्य जयराम पाटील, जोतिबा शहापुरकर,बाबू पावशे, रोशनीचे प्रशिक्षक प्रशांत शहापुरकर,आदी उपस्थित होते.
यावेळी रोशनीचे वडील वसंत मुळीक व आई वैष्णवी मुळीक व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोशनीला शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध मान्यवर व परिसरातील अनेक महिला , नागरिक उपस्थित होते.
