
संदेश क्रांती न्यूज :
दि.खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे प्रभारी सेक्रेटरी एन वाय. पाटील(निवृत्ती पाटील) हे गेल्या ३१ वर्षापासुन अतिशय निष्ठेने व
प्रामाणिकपणाने सेवा बजावली. आणि
एप्रिल २०२५ मध्ये सेवा निवृत्त झाले.
याकाळात शिक्षक सोसायटीच्या प्रगतीसाठी काम केले त्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सोसायटीच्या कामात शिक्षकाना वेळोवेळी सहकार्य करत आडचणी दुर केल्या त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाना त्यांच्याबद्दल आदर होता.
सर्वाच्या सहकार्याने त्यानी चांगल्या प्रकारे सेवा बजावून ते आज निवृत्त झाले. त्याचे उर्वरीत सुखा समाधानाचे जावो.त्याना दीर्घायुष्य लाभो.अशी सदिच्छा माजी चेअरमन वाय एम पाटील यानी सत्काराच्या वेळी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन आय.जे.बेपारी उपस्थित होते.
तर व्यासपिठावर संचालक एस. एल. हळदनकर,एन.एल.शिवनगेकर, महेश कुंभार,बी.बी.मेदार,बी.बी.चापगावकर,
के.एच.कौंदलकर,एल व्ही गुरव,प्रकाश मादार ,शिवा पाटील, श्री सोनारवाडकर,
जे.पी.पाटील, माजी चेअरमन वाय.एम.पाटील, संचालिका सौ .जे.ए.मुरगोड,श्रीमती मीरा पाटील आदी उपस्थित होते.
तसेच राष्ट्रपदक विजेते आबासाहेब दळवी, डी.एम.भोसले, ए.एम पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने व फोटो पुजनाने झाली.यावेळी चेअरमन आय जे बेपारी यानी उपस्थितांचे स्वागत केले.
सत्कार मुर्ती प्रभारी सेक्रेट्ररी एन.वाय.पाटील यांचा सपत्नीक सत्कार सोसायटीच्यावतीने शाल,पुष्पहार,भेटवस्तू देऊन करण्यात आला.त्याचबरोबर विविध शाळाचे शिक्षक,निवृत्त शिक्षक,व नातेवाईकाकडुन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरानी सत्कारमुर्ती एन वाय पाटील यांच्या कार्याबद्दल गौरव उदगार काढले.
कार्यक्रमाला तालुक्यातील प्राथमिक शाळाचे शिक्षक व नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक संघटनेचे कार्यदर्शी पिराजी पाखरे यानी केले.
तर आभार संचालक एस.एल.हळदनकर यानी मानले.