#एसडीएमसी नुतन अध्यक्ष रामचंद्र पाटील!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हलकर्णी ( ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत युवा दिन व स्वामी विवेकानंद जयंती दिनाचे औचित्य साधुन शाळेच्या नूतन एस डी एम सी समितीची निवड करण्यात आली.
प्रारंभी युवा दिन साजरा करून ग्राम पंचायत सी. ए. सी कमिटीच्या अध्यक्षतेखाली नूतन एस डी एम सी समितीची स्थापना करण्यात आली.
या वेळी अध्यक्षस्थानी माजी एस डी एम सी अध्यक्ष कृष्णा चौगुले होते.तर बैठकीला ग्राम पंचायत सदस्या सौ. रेणुका कुंभार,सेक्रेटरी निखील सोज,शिक्षण प्रेमी व देणगीदार अविनाश खानापूरी, महेश चौगुले आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक के.एम.बेलगामी यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.तर सेक्रेट्ररी निखील सोज यानी समितीची रचना कशी करायची या बद्दल माहिती सांगीतली.
या वेळी नूतन एस डी एम सी अध्यक्षपदी रामचंद्र यल्लापा पाटील या ची निवड करण्यात आली.,तर उपाध्याक्षपदी सौ.रंजना काटगाळकर यांची निवड करण्यात आली.
सदस्यपदी कृष्णा राऊत, यल्लापा बाळेकुंद्री, उमेश शिंगाडे,महादेव चौगुले,रमेश सुतार, प्रवीण चौगुले, राजू चौगुले, किरण पाटील , सदस्या अश्विनी बंडीवड्डर, सोनम पवार,पुनम चिरमुरकर,वर्षा बेळगावकर, स्नेहल चौगुले,अनिता पाटील, मेघा गुंजीकर, वनिता मासेकर यांची निवड करण्यात आली आहे.
ही एस डी एम सी निवड बीन विरोध व एक मताने निवड करण्यात आली.यावेळी आजी माजी अध्यक्ष व सदस्याचा पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
बैठकीला शिक्षक श्रीमती एन एस शेटकर,. आर पी कलम, आय जे जेडर,विद्यार्थ्याचे पालक,शिक्षण प्रेमी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार मुख्याध्यापक के.एम.बेलगामी यानी मानले.


