संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
शुक्रवारी खानापूरच्या मलप्रभा नदीच्या पात्रात दुर्मिळ अशा पाण कुत्र्याचे दर्शन अनेक नागरीकाना झाले.
शुक्रवारी पहाटेच्या वेळी दुर्मिळ अशा जवळपास ५ ते ६ पाण कुत्र्यांचे नदीच्या पात्रातील मांशाची शिकार करताना नागरीकांना दर्शन झाले. यावेळी पाळीव कुत्री ही नदी काठी उभे राहुन भुंकत होती.
या वेळी पाण कुत्री सुध्दा पाळीव कुत्र्यांच्यावर धावून जात होती.
दुर्मिळ पाण कुत्र्यांचे नागरीकाना दर्शन!
पाण कुत्र्याचे दर्शन गेल्या कित्येक वर्षानंतर झाले आहे.खानापूर च्या मलप्रभा नदीपात्रात दुर्मिळ अशा पाण कुत्र्यांचे दर्शन झाले अस ले तरी ते नागरीकाना धोक्याचे आहे.त्यामुळे नागरीकांतुन भितीचे वातावरण निर्माण झाले.
वनखात्याने याकडे लक्ष देणे गरजेचे!
दुर्मिळ अशा पाण कुत्र्याचे खानापूर च्या मल प्रभा नदीपात्रात दर्शन झाल्याने याकडे खानापूर वनखात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
कारण यापासुन माणसाना अथवा जनावराना धोका संभवतो आहे.
खानापूर तालुक्यातील गेल्या कित्येक वर्षानंतरची ही पहिलीच घटना आहे.
तेव्हा सर्वानी याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

