#हलकर्णी ग्रा.पं.जमा बंदी कार्यक्रमात अँड. ईश्वर घाडी यांचा सज्जड ईशारा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हलकर्णी (ता.खानापू) ग्राम पंचायत हद्दीतील सामान्य जनतेला सरकारच्या योजना संदर्भात लाभ झाला नाही तर पी डी ओ अधिकारी , सेक्रेटरी, व इतर कर्मचार्याना चांगलाच धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. असा सज्जड ईशारा खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी गुरूवारी दि.८ रोजी हलकर्णी (ता.खानापूर) ग्राम पंचायतीच्या जमा बंदी कार्यक्रमात बोलताना दिला.
हलकर्णी ग्राम पंचायत हद्दीतील बेळगाव पणजी महामार्गाशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा साचला जातो.याकडे ग्राम पंचायतीचे साफ दुर्लक्ष होते.यापरिसरात कोर्ट कार्यालय तसेच काॅलेज आहे.त्यामुळे कचर्याच्या दुर्गधीचा त्रास सर्वाना सहन करावा लागतो. तसेच गावातील कचर्याचा प्रश्न मार्गी लावा.असा ईशारा दिला.
जमाबंदी कार्यक्रमाला नोडल अधिकारी म्हणून तालुका पंचायतकार्यालयाचे एडीपीआर विजयकुमार कोथीन उपस्थित होते.
या वेळी अँड ईश्वर घाडी म्हणाले की,
हलकर्णी ग्राम पंचायतीने मंजुर केलेल्या रामा कृष्णा खानापूरी या पतीपत्नीच्या घराच्या वाटणीची कोर्टाची नो आँब्जेक्शन आँर्डर असताना त्याच्या पत्नीला चार महिने ग्राम पंचायत पीडीओ ये जा करायला लावतात.त्यामुळे त्या महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागतो. याची स्व ता ची प्रापर्टी असताना ग्राम पंचायत दुर्लक्ष का करते. अशी कामे त्वरित करायला हवी. असे सांगीतले.
सिध्दया हिरेमठ याना लेआउट प्लाॅटला एन ओ शी देण्यास दुर्लक्ष का?
हलकर्णी ग्राम पंचायत पीडीओ अग्री कल्चर लॅन्ड मधील एन ओ सी एका व्यक्तीला देतात दुसर्या व्यतीला देत नाही. याचे एक उदाहरण म्हणजे सिध्दय्या हिरेमठ २००३ साली अग्रीकल्चर लॅन्ड खरेदी करून गेली २२ वर्षे एन ओ सी साठी प्रयत्न करतात. उत्तारा देत नाहीत. त्यानी जिल्हा अधिकार्याकडुन २००३ मध्ये खरेदीपत्र तयार करून एन ए आँर्डर करून घेतली आहे.ले आँऊट करून गेली दोन वर्षापासुन उत्तारा देत नाही?.असा सवाल केला.
या वेळी खानपूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर म्हणाले की ग्राम पंचायतकडे कचरा गाडी आहे.वाहन चालक आहे.मात्र रस्त्याच्या कडेला कचरा पडुन असतो.याचा नागरीकाना त्रास होतो.तेव्हा ग्राम पंचायत काय करते कचर्याचा इल्लेवाट का करत नाही.गावातील कचरा गेला पाहिजे. असा ईशारा दिला.
य़ावेळी नागरीकानी पीडीओ आलेल्या नागरीकांच्या समस्या जाणून घेत नाहीत. कोणतीच कामे वेळेत करत नाहीत. कम्प्यूटर आँपरेटर मनमानी कारभार करतात.क्लार्क आपल्या मर्जीतल्या लोकाची कामे करतात.
तेव्हा पी डी ओ व काॅप्यूटर आँपरेटर, क्लार्क आदीची बदली करावी. अशी निवेदना व्दारे मागणी केली.
रूग्णाच्या आजाराच्या उपचारासाठी पैशाची गरज होती म्हणून ग्राम पंचायतीकडे कर्जासाठी घरच्या उताराची मागणी केली होती. परंतु चार महिने ताटकळ ठेवल्याने.एका नागरीकाला त्रास सहन करावा लागला.
काही शेतकर्याना कृषी होंडा, जनावरांच्या गोट्यासाठी वेळेत कामे केली नाहीत.त्यामुळे त्रास झाला.
गांधीनगर ,हलकर्णी , व इतर भागात गटारीची समस्या सुटली नाही.
असे सांगताना अँड ईश्वर घाडी म्हणाले की, मी गेली ३२ वर्षे याभागात राहतो ,सस्ता गटारीची समस्या अद्याप सुटली नाही.असे सांगीतले.
हलकर्णी ग्रामपंचायत मधील कर्मचारी व पी डी ओ यांच्या मन मानीला हलकर्णी ग्रामपंचायत हद्दीतील जनता अक्षरशा कंटाळली आहेत. एकही काम व्यवस्थित होत नाही. उतारा घेण्यासाठी गेली दोन दोन वर्षे घरचे उतारे मिळत नाहीत. तसेच कोणतेही काम मग ते जनतेचे असो वा कॉन्ट्रॅक्टरचे असो दोन दोन वर्ष कामे होत नव्हती व ग्रामपंचायतच्या अध्यक्ष व सदस्याना कवडी मोलाची किंमत मिळत नव्हती .याचा जाब पीडीओ व तालुका पंचायत अधिकाऱ्यांना हलकर्णी ग्रामपंचायत मध्ये विचारून त्यांची चांगलीच धुलाई केली. यावेळी वकील संघचनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी तसेच ग्रामपंचायत युनियन सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर , सामाजिक कार्यकर्ते य़शवंत बीर्जे उपस्थित होते.
तर या वेळी व्यासपिठावर ग्राम पंचायत अध्यक्षा सौ.जीजा अल्लोळकर,उपाध्यक्षा सौ. उज्वला भैरू कुंभार पीडीओ रेष्मा पाणीवाले उपस्थित होत्या.
तर सदस्य प्रवीण अगणोजी सदस्या सौ .भरमव्वा नाईक,सौ.रेणुका कुंभार,सौ.पार्वती शिंगाडे,सौ महबुबी शेख,सौ. शोभा शिंगाडे व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार पीडीओ रेष्मा पाणीवाले यानी मानले.

