संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर हेस्काॅम कार्यालयात प्रत्येक महिण्याच्या तिसर्या शनिवारी होणार्या ग्राहक मेळाव्यात ग्राहकांच्या तक्रारीवर चर्चा करूण समस्या सोडविल्या जातात.
त्यानिमित्त शऩिवारी दि.२० डिसेंबर रोजी खानापूर हेस्काॅम कार्यालयात ग्राहक मेळावा कार्यनिर्वाह कार्यकारी अभियंते प्रदीप बरगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
प्रारंभी सहाय्यक अभियंते एस पी अंगडी यानी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी ग्राहक खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर यानी कांजळे मराठी शाळा जवळ सर्व्हिस वायर लोंबकळत असुन विद्यार्थ्याच्या जीवीताला धोका संभवतो आहे.तेव्हा सर्व्हिस वायर बदला . अशी मागणी केली.
तसेच बरगाव ग्राम पंचायतीच्या हद्दीतील निडगल गावाजवळील सिध्दाची वाडी ये थे २४ तास वीजपुरवठा करा . यासाठी गेल्या वर्षभरापासुन प्रयत्न करत आहे. तेव्हा ही समस्या त्वरित सोडवा. तसेच गवळीवाडा कांजळे रोडवरून विधुत लाईन द्या.आंबोळी च्या मायादेवी मंदिराला विधुत खांब घालुन लाईन द्या.कांजळे येथील वाणी कंपनी यांच्या शेतातुन आलेली आल्लोळी कोकणवाडा येथुन आ ले ले कनेक्शन बंद करून शेतातील टी.सी.वरून वाणी कंपनीला कनेक्शन द्यावे.अशी मागणी केली.
कोंकणवाडा येथील विधुत लाईन लिलावडे ते कोकणवाडा मार्गे लाईन द्या. अशी मागणी अशोक सावंत यानी केली .
या वेळी ओतोळीच्या टोपाणा पाटील यानी आपली तक्रार मांडली.अल्लोळीच्या गोपाळ लोंढेकर यानी ही तक्रार मांडली. बिजगर्णीच्या वाय पी सुतार,निडगलचे एस एन कदम , खानापूरचे यशवंत बिर्जे ,मंचापूरचे लक्ष्मण कदम आ दी नी आपल्या तक्रारी ग्राहक मेळाव्यात मांडल्या.
या वेळी तालुक्यातील अनेक ग्राहकांनी तक्रारी मांडल्या.
या वेळी कार्यनिवाहक कार्यकारी अभियंते प्रदीप बरगले यानी तक्रारी ऐकुण घेऊन लवकरात लवकर समस्या सोडवू. असे आश्वासन दिले.
ग्राहक मेळाव्याला सहाय्यक अभियंते एस पी अंगडी,सेक्शन आँफिसर भऱतेश नागनुर, जायवेद नाईकवाडी,नागेश देवलतकर, एस एन मुरगोड, एस एम चक्रिमठ आदी सेक्शन आँफिसर उपस्थित होते.
जयवेद नाईकवाडी यानी आभार मानले.


