#गर्लगुंजी जे पी व्ही विद्यालयाच्या सन१९८३-८४ बॅचच्या इयत्ता १० वीच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बालपणीच्या आठवणीने माजी विद्यार्थी झाले भावुक गर्लगुंजी (ता.खानापूर ) येथील ज्योतिराव फुले विद्यालयाच्या सन १९८३-८४ सालच्या इयत्ता १० वीच्या माजी विद्यार्थ्याचा ४१ वर्षानंतर स्नेह मेळावा पार पडला.
या वेळी बोलताना निवृत्त मुख्याध्यापक मालोजी अष्टेकर म्हणाले की, ४१ वर्षाचा काळ निघुन गेला.आणि ४१ वर्षानंतर आम्हा शिक्षकाना बोलवून जो आदर सत्कार केला.याला मोल नाही.एवढेच नव्हेतर माजी विद्यार्थ्यानी आपल्या पत्नीना बोलावून बालपणीच्या आठवणीना उजाळा दिला. आपल्या मूलाना उच्च शिक्षित करून याची कल्पना आम्हा पर्यत पोहचविला.हा आनंद वेगळाच दिला.हे सर्व एकूण आम्हाला खरी गुरूदक्षिणा मिळाल्याचा आनंद मालोजी अष्टेकर आपल्या भाषणातुन व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जेष्ठ विद्यार्थी कल्लापा भेडीगिरी होते.व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक जे. एस.शहापूरकर,निवत्त मुख्याध्यापक मालोजी आष्टेकर,श्री .सपकाळे, निवृत्त मुख्याध्यापक आर डी पाटील,निवृत्त शिक्षक एम पी कदम, निवृत्त चित्रकला शिक्षक श्री एकणेकर, निवृत्त क्रिडा शिक्षक एम पी पाटील, आय.एन कदम,खो खो कोच वाय.सी गोरल, एल जी कोलेकर, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील,माजी टी.पी.पांडुरंग सावंत, मुख्याध्यापक के.एम.पाटील,गणपत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन व फोटो पुजन करण्यात आले.त्यानंतर माजी विद्यार्थ्यानी आपल्या बालपणीच्या आठवणीना उजाळा देत,शिक्षकाच्या सहवासातील आठवणी तसेच आपल्या कुटूंबाची ओळख करून दिली.
तर निवृत्त मुख्याध्यापक जे.एस. शहापूरकर म्हणाले की,जे पी व्ही हायस्कूलमध्ये गेली अनेक वर्षे मुख्याध्यापक म्हणून सेवा करताना गरीब विद्यार्थ्याच्या समस्या जवळून पाहिल्यात माझ्या हातुन अनेक विद्यार्थी शिकुन उच्च पदावर कार्यरत आहे.याचा मला अभिमान वाटतो.
या वेळी बोलताना आर डी पाटील म्हणाले माझ्या कडक शिस्तीमुळे विद्यार्थी दोन हात दुरच राहायचे.गणित विषयात अनेक विद्यार्थी लहान पणापासुन माझ्या हातुन शिकुन उच्च पदावर गेले आहेत.शाळेत असताना विद्यार्थी भितीनेच अभ्यास करायचे.अभ्यासाबरोबर खेळात ही माझ्याकडुन विद्यार्थी चांगले धडे घेतले आहेत.विद्यार्थ्यानी जीवनात चांगले यश मिळविले.हीच आमची गुरूदक्षिणा आहे. असे सांगुन शाळेच्या वेळेतील अनेक सुखद आठवणीना उजाळा दिला.
तर एम पी कदम यानी आपल्या शिक्षकी सेवेतील आठवणी सांगीतल्या,
एल जी कोलकर यानी हायस्कूलमध्ये सेवा करताना क्रिडाक्षेत्रात केलेल्या कामगीरीची माहिती दिली. यावेळी पांडुरंग सावंत यानी आप ले विचार व्यक्त केले.
या वेळी गुरूजनांचा शाल,मानचिन्ह, भेट वस्तु व पुष्प हार घालुन सत्कार करण्यात आला.तसेच माजी विद्यार्थी जे सैन्यातुन निवृत्त झाले, पोलिस अधिकारी म्हणून तसेच आदर्श शिक्षक व इतर क्षेत्रात कार्य केलेल्या मा जी विद्यार्थ्याचा ही सत्कार करण्यात आला.
या वेळी माजी विद्यार्थ्या परशराम पाटील,सुब्राव पाटील,पुंडलिक मेलगे,राजू हंप्पणावर,यल्लापा कुंभार,भिमराव कोलेकर,परशऱाम चौगुले,संतोष पाटील,पा डी कुंभार,पी आर कुंभार, मोहन गोरे,शामराव देसाई, दत्तू भातकांडे,अनंत पाटील, प्रकाश कुंभार,रमाकांत पाटील,सुहास पाटील, प्रताप पाटील, शिवाजी पाटील,इराप्पा कुंभार, परशराम पालकर, श्रीकांत बुरूड,गणपत सावंत,नारायण मे लगे, प्रकाश चिगदीणकोपकर,शिवाजी भक्तुरी,नारायण य़ळूरकर,प्रकाश करंबळकर,नागेश जोगोजी,एल डी पाटील,भिकाजी देसाई, सौ.कृष्णाताई हलगेकर,सौ.शांता मेलगे आदी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्याना श्रध्दांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश भातकांडे यानी केले. आभार मल्लापा वार्णाेळकर यानी माणले.
