# निलावडे ग्रा. पं. सदस्य विनायक मुतगेकर यांच्या प्रयत्नाला यश!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कबनाळी (ता. खानापूर ) येथे शनिवारी दि. ६ रोजी वर्ल्ड नाबार्ड बँकेच्या अधिकाऱ्यांची रस्त्याच्या पाहणी दौऱ्या भेटसाठी दिल्लीहून थेट सांबरा एअरपोर्टवरून कबनाळी ( ता. खानापूर ) गावाला भेट दे ऊन गावच्या रस्त्या साठी पी एम जी एस वाय योजनेतून तीन कोटीचा निधी मंजूर झाला, असून सदरी निधी मंजुरीसाठी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर यानी गेली दोन वर्षे प्रयत्न करत होते.सदरी प्रयत्नांना यश आले असून शऩिवारी नाबार्ड बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपण सदरीनिधी रस्त्याच्या कामासाठी देतो असे वचन दिले. व आपण त्या रोडचे इस्टिमेट करून प्रपोजल पाठवा असे पी एम जी एस वाय अधिकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर सौ नूतन यांना आदेश दिले. नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की,आपण नाबार्ड बँकेतून देशातील सात हजार किलोमीटर रोड साठी निधी पुरवणार आहे. त्याच्यामध्ये कर्नाटक राज्यातून बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातुन कबानाळी हे एकमेव गाव आहे. आणि या गावचा तीन किलोमीटर रस्ता होणार आहे.
यावेळी अधिकाऱ्यांचे ग्रामस्थातर्फे व विनायक मुतगेकर तसेच ग्रामपंचायत मार्फत स्वागत करण्यात आले सदरी काम करून घेण्यासाठी विनायक मुतगेकर यांनी या कामासाठी खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांचे सहकार्य लाभले असे सांगितले.

