#आम.विट्ठल हलगेकर यांच्याकडुन पाच लाखाचा निधी मंजुर!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
चापगांव ( ता खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शतक महोत्सव कार्यक्रम येत्या फेब्रुवारी २०२६ मध्ये साजरा होत आहे.
त्या अनुषंगाने शतक महोत्सव कमिटी वतीने तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर य़ांची भेट घेऊन त्यांना शाळेच्या विकासासंदर्भात व शतक महोत्सव संदर्भात निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी लागलीच पाच लाखाचा निधी आपण शतक महोत्सवच्या अगोदर मंजूर करून देऊ ,अशी ग्वाही आमदार विठ्ठल हलगेकर यानी दिली.
याप्रसंगी उपस्थित कमिटीचे अध्यक्ष विलास धबाले, उपाध्यक्ष महादेव दळवी, सचिव यल्लाप्पा कुकडोळकर, खजिनदार मष्णू चोपडे ग्रामपंचायत माजी अध्यक्ष रमेश धबाले, पी के पी एस अध्यक्ष उदय पाटील, कार्याध्यक्ष जयदेव अंबाजी, उपखजिनदार अभिजीत पाटील, उपसेक्रेटरी बशीर सनदी, अरुण प्रभू कदम, अरुण धबाले, बळवंत पाटील ,आधी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी शतकमहोत्सव कार्यक्रमाला पाच लाखाचा निधी मंदिर करून देतो.असे आश्वासन दिल्याबद्ल चापगांव सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा शतक महोत्सव कमिटी तसेच ग्रामस्थातुन व शिक्षणप्रेमीतुन समाधान पसरले आहे.
