संदेश कांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावरील तिवोलीवाडा क्रॉसजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
रस्ता ओलांडताना हरणाला वाहनाची धडक बसली. घटनेची माहिती मिळताच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सविस्तर माहिती घेतली.
यावेळी गुंजी विभागाचे सहाय्यक वनपाल राजू पवार यांनी घटनेची शहानिशा केली. त्यानंतर ए.सी.एफ. सुनिता निंबर्गी तसेच लोंढा वाहन भागाचे वन क्षेत्रपाल वाय.पी. तेज यांनी घटनेचा पंचनामा केला. लागलीच मृत हरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या राष्ट्रीय महामार्गावर जंगली प्राण्यांना ओलांडता यावे. म्हणून भुयारी सोय करण्यात आली आहे. मात्र जंगली प्राणी बराच वेळा रस्त्यावर येत असल्याने अशा घटना अनेक वेळा घडत आहेत. त्यामुळे संबंधित वन खात्याची चिंता वाढली आहे.
