#शिंदोळी, शिवठाण कापोली आदी भागात भात पिकाचे हत्तींकडून प्रचंड नुकसान!
#वन खात्याचे लोकप्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा जंगलाने वेढलेला तालुका आहे या तालुक्यात जंगली प्राण्याकडून वर्षभर त्रास होतच आहेत.
कधी मनुष्य वर हल्ला तर कधी उभ्या भात ऊस पिकाचे नुकसान हे नित्याचे झाले आहे.
मात्र याकडे वन खात्याचे ना लोकप्रतिनिधी लक्ष नाही.
त्यामुळे खानावळ तालुक्याच्या जंगल परिसरातील नागरिकांतून नाराजी पसरली आहे.
नुकताच ऐन सुगीच्या काळात मास्केनहट्टी शिवारात हत्तीकडून भात पिकाचे नुकसान झाले.
ऐन सुगीच्या काळात मास्केनहट्टी शिवारात हत्तीकडून भात पिकाचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवार दिनांक 24 रोजी मास्केनहट्टी शिवारात हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे उभ्या भात पिकात हत्तीने प्रचंड नुकसान केले आहे.
मास्केनटीसह, गस्टोळी, भरूनकी, करी कट्टी, आधी शिवारातच्या हत्तीनी ठाणे मांडुन उभ्या पिकांची नुकसान केले आहे.
गेल्या आठ दिवसा त पुन्हा शिंदोळी , शिवठाण, कापोली शिवारात हत्तीनी ठाणे मांडून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
शिंदोळी येथील शेतकरी श्रीकांत पाटील यांच्या शिवारात तीन हत्तींनी घुसून भात पिकाचे तुडवून नुकसान केले आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
त्यामुळे गरीब शेतकऱ्याचे कंबर्डे मोडले आहे. याकडे संबंधित वन खात्याचे तसेच लोकप्रतिनिधीचे डोळेझाक होत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तरी अद्याप कुणीच याची दखल घेतली नाही मात्र शेतकरी हत्तींना पळवून लावण्यासाठी धडपडत आहेत.
सध्या सर्वत्र सुगीचे हंगाम आले आहे त्यातच पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वैतागला आहे आता तोंडाशी आलेले भात पीक हत्तींच्यामुळे हातातून जाणारे अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
यासाठी वन खात्याने हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.