#तीन नोव्हेंबरला रस्ता रोको चा इशारा!
संदेश कांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे यासाठी प्रति टन 3500 रुपये दर घोषित करावा तसेच कारखान्यास कडून होणारी काटेमारी व समोर तोडणे व वाहतुकीतील अन्यायकार थांबवावी यासाठी अखिल कर्नाटक रयत संघ बेंगलोर तर्फे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना तहसीलदार मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन देताना म्हटले आहे की शेतकऱ्या ने काबाडकष्ट करून ऊस उत्पादन करत आहेत. त्याला एक टन ऊस उत्पादनासाठी 2500 रुपये खर्च येतो परंतु कारखानदार केवळ 2500 ते 3000 इतकाच दर दिला जातो त्यामुळे पेट्रोल डिझेल खत औषध तसेच मजुरांचे वाढते दर लक्षात घेऊन सरकारने 3500 रुपये प्रति टन दर द्यावा अशा मागणीची निवेदन तहसीलदार धोंडाप्पा कोमार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले याशिवाय इतर मागण्या करण्यात आले आहेत.
शेतकऱ्याच्या उसाला प्रति टन 3500 रुपये दर घोषित करावा ऊस तोडणी घटाने फक्त कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी मिळणारे अधिकृत पैसे घ्यावेत. कारखाना मधील वजन काट्यावर होणारी दोन टनापर्यंतची काटेमारी थांबवावी. अशा प्रकारच्या गैर प्रकारांमध्ये दोषी कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी ऊस वाहतुकीसाठी वापरणाऱ्या ट्रकवर टोल नाक्यावरील कर माफ करावा.
वरील मागण्यावर येत्या पाच दिवसात सरकारने निर्णय घेतला नाही तर येत्या तीन नोव्हेंबर रोजी खानापूर येथे कालगुप्पा बेळगाव राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
या मागण्यांचे निवेदन प्रादेशिक आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस खाते तहसीलदार तसेच आमदार यांना देण्यात आले आहे यावेळी रयत संघाचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


