#गर्लगुंजी ग्रा.पं. सदस्य प्रसाद पाटील यांचा आगार प्रमुखांना सवाल!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील नागरिक ना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशाच प्रकारची समस्या खानापूर बस आगारातील बसेसच्या नादुरुस्त अवस्थेमुळे विद्यार्थी व नागरिकांच्या समस्या वाढल्या असून खानापूर आगार प्रमुख तसेच त्यांचे सहकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे वेळेवर बसेस दुरुस्त न झाल्यामुळे अनेक बसेसचे कंट्रोल बोर्ड, ब्रेक्स, बसेसचे गळते छत, स्टेरिंग रिकामी झाल्याचे वास्तव्यात उघड झाले आहे. अशा नादुरुस्त बसेस रस्त्यावर धाव कशा दिल्या जात आहेत.
नुकताच खानापूर तालुक्यात बस रस्त्याच्या बाजूने गेल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. तर त्याचवेळी म्हैस गंभीर जखमी झाली. विद्यार्थी बाहेर फेकले गेले. अशी घटना घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून मोठा अपघात टाळला. या अपघातात कोणाचा तरी जीव गेला असता त्याला जबाबदार कोण?
या परिस्थितीची दखल घेऊन गर्लगुंजी ग्रामपंचायतचे सदस्य प्रसाद पाटील यांनी बस चालकाकडून व्यवस्थित दुरुस्ती व मेंटेनन्स याची स्थिती तपासणी.बसचालकाने
समोरच प्रात्यक्षिक दाखवले. त्यामुळे बसच्या अनेक गंभीर त्रुटी स्पष्ट झाल्या. लागलीच गर्लगुंजी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी आगार प्रमुखांची भेट घेऊन चांगलीच खरडपट्टी काढली. व आगार प्रमुखांना खडसावून सांगितले की विद्यार्थी आणि प्रवासी वर्गांचे जीव धोक्यात घालू नका बसेसचे मेंटेनन्स व दुरुस्ती वेळच्यावेळी करून त्या बसेस रस्त्यावरून धावू द्या. योग्य व सुरक्षित बसेसच बस वाहतुकीसाठी वापरात घ्या. असे खडसावून सांगितले.
यावेळी नगरसेवक तोहिद चांदखनावर व इतर मान्यवर उपस्थित होते.
