संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गेल्या १५ दिवसापासुन डाॅ.वीरेंद्र हेगडे यांच्याविरूध्दात समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर अपप्रचार करण्यात येत आहे. तेव्हा संबधितावर कारवाई करावी.
या मागणीसाठी सोमवारी दि .२५ खानापूर राम मंदिरापासुन तहसील कार्यालयापर्यत मोर्चा निघणार आहे.
अशी माहिती शनिवारी दि.२३ रोजी खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात पत्रकार परिषेद दिली.
यावेळी बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,तालुका अध्यक्ष संजय कुबल ,महिल्या नेत्या धनश्री सरदेसाई, युवा नेता पंडित ओगले,अँड.चेतन मणेरीकर,सचिव गुंडू तोपिनकट्टी,माजी शहर अध्यक्ष राजेद्र रायका,सदानंद होसुरकर आदी उपस्थित होते.