संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नंदगड ( ता. खानापूर )येथील नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या सभागृहात तालुका रेशन दुकानदारांचीबैठक संपन्न झाली .
बैठकीच्या अध्य़क्षस्थानी अध्यक्ष वैभव कुलकर्णी होते.
यावेळी प्रमुख उपस्थित गॅरेंटी योजना अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी व उप तहसीलदार शरणाप्पा बागेवाडी आहार विभाग, महादेव दळवी माजी अध्यक्ष, यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.
यावेळी सुर्यकांत कुलकर्णी
यांनी बोलताना सांगितले संपूर्ण बेळगाव जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त खानापूर तालुक्यामध्ये रेशन वितरण व्यवस्थित होत आहे.आणि गॅरेंटी योजनेच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व दुकानदारांनी तालुक्यातील रेशन धारकांना योग्य त्या पद्धतीने रेशन वाटप असो किंवा ही केवायसी संदर्भात असो आपण चांगले काम केला त्याबद्दल मी गॅरेंट योजनेचा अध्यक्ष या नात्याने आपल अभिनंदन करतो, व ई केवायसी संदर्भात येणाऱ्या दहा नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे. तर खानापूर तालुक्यातील 17377 ती केवायसी बाकी असून ज्याने कोणीही केवायसी केली नाही त्यांनी आपापल्या दुकानात जाऊन एकेवायसी करून घ्यावी अन्यथा रेशन कार्ड रद्द होईल याची दक्षता घ्यावी व दुकानदारानी सुद्धा आपल्या गावात परत एकदा कळवून एकेवायसी करून घ्यावी असा सल्ला दिला यावेळी लोंढा गावातील रेशन या महिन्यात अगदी व्यवस्थित वाटप झाल्याचे मोहिशेत पंचायत व लोंढा पंचायतीच्या नागरिकांनी कळवले आहे पण लोंडा दुकानदारांना एक विनंती अध्यक्ष यांच्याकडून करण्यात आली की रेशन आल्यानंतर पहिला सहा दिवस मोहीशेत पंचायतीमधील नागरिकांना रेशन वाटप करावेत महिन्यातील लोंडा पंचायतीमधील नागरिकांना वाटप करावे असा सल्ला दिला तसेच अन्न सुविधा म्हणून बेड पेशंट किंवा वयोवृद्ध असणाऱ्या रेशन धारकांना दोन टक्के घरपोच रेशन द्यायचे आहे त्या सुविधेबद्दल रेशन दुकानदाराने गावातील कोणी लाभार्थी असतील त्यांची लिस्ट तहसीलदार ऑफिसला द्यावी व त्यांचे रेशन घरपोच करावे असे सांगितले, निलावडे पंचायतला जे कुणी रेशन वाटप करत आहे त्यांनी चार दिवस रेशन वाटप केलं पाहिजे नाहीतर ते रेशन दुकान रद्द करण्यात येईल असे सांगण्यात आले तसेच आपण सर्व दुकानदार व्यवस्थित काम करत राहावे तसेच दुकानची स्वच्छता दुकान समोरील बोर्ड व्यवस्थित करून घ्यावेत, आपण नागरिकांचे काळजी घेत आहात तसे मी गॅरंटी योजना अध्यक्ष या नात्याने दुकानदारांची काळजी घेईन मी दुकानदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्याला सहकार्य करीन आपण कोणतीही चूक करू नका आपलं नाव खानापूर तालुक्याच रेशन चांगलं वाटल्यामुळे सर्व पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण बेळगाव जिल्ह्याला कळत असल्यामुळे खानापूर तालुका एक नंबर रेशन बाबतीत आहे हे समजलं आहे एवढेच आपण नावलौकिक करायचे आहे आपल्याला कोणताही त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो असे समजून सांगितले, या बैठकीला मार्केटिंग सोसायटीचे मॅनेजर ज्ञानेश्वर निलजकर , आहार विभागाचे निरीक्षक खातेदार खानापूर तालुक्यातील रेशन असोसिएशनचे सदस्य तसेच सर्व दुकानदार उपस्थित होते.
