#कोणत्याही एका जि.प.वर उमेदवारी द्या!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी जिल्हा पंचायतीवर सामान्य महिला तर पारिश्वाड जिल्हा पंचायतीवर अनुसुचीत जाती महिला आरक्षण आल्याने दोन्ही जिल्हा पंचायतीवर निवडणुकीसाठी मी सौ.अनिता सुरेश दंडगल इच्छुक असुन पक्षाकडुन कोणत्याही एका जिल्हा पंचायतीवर उमेदवारी द्यावी.ती मी समर्थपणे निवडणुक लढवुन पक्षाला विजयाची पताका मिळवुन देईन असा विश्वास खानापूर तालुका माजी काॅग्रेस महिला ब्लाँक प्रेसिडंट सात वर्षे कार्य केले आहे.
तेव्हा खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेसच्या गोटातुन गर्लगुंजी किंवा पारिश्वाड जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सौ अनिता सुरेश दंडगल उमेदवारीची मागणी करत आहेत.
गर्लगुंजी जिल्हा पंचायतीवर काॅग्रेसचा विजय मिळविण्यासाठी प्रयत्न!
खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी जिल्हा पंचायतीवर आज तागायत समितीच्या उमेदवारा शिवाय इतर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला विजय प्राप्त करने शक्य झाले नाही.हा इतिहास मोडुन काढण्यासाठी माजी कर्मभुमी हलकर्णी (ता. खानापूर ) असुन हलकर्णी ग्राम पंचायत सुध्दा गर्लगुंजी जिल्हा पंचायतीत समाविष्ट आहे.त्यामुळे गर्लगुंजी जिल्हा पंचायती येणार्या हलकर्णी गर्लगुंजी
,तोपिनकट्टी, बरगाव ,इदलहोंड, निट्टूर, नागुर्डा, लोकोळी यासर्वच ग्राम पंचायती माझा काॅग्रेस पक्षाच्या कार्यक्रमातुन मी महिला अध्यक्षा म्हणून काम केले. त्यामुळे मला गर्लगुंजी जिल्हा पंचायतीवर चांगलीच पक्कड आहे.असा विश्वास आहे.
माझे पती सुरेश दंडगल हे सुध्दा काॅग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत.त्याचबरोबर त्यानी गर्लगुंजी जिल्हा पंचायतीतील अनेक गावात काॅट्रक्टर या नात्याने कार्यरत आहेत. गावागावात त्यांचा परिचय आहे.
तेव्हा मला काॅग्रेस पक्षातुन गर्लगुंजी जिल्हा पंचायतीवर उमेदवारी मिळाली तर विजय प्राप्त करून पहिल्यांदाच गर्लगुंजी जिल्हा पंचायतीवर विजयाचा पताका फडकवु असे मनोगत व्यक्त केले.
पारीश्वाड जि.प.वर निवडणुक लढवु!
खानापूर तालुक्यातील पारिश्वाड जिल्हा पंचायतीवर अनुसुचित जाति महिला आरक्षण असल्याने या ठिकाणी सुध्दा निवडणुक लढविण्यास माजी तयारी आहे.
पारिश्वाड जिल्हा पंचायत विभागात सुध्दा काॅग्रेस महिला ब्लाॅक प्रेसिडेट यानात्याने
कार्य केले आहे.
तेव्हा पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करून मला संधी द्यावी.