#जांबोटी भागातील कार्यकर्त्याचा पाठींबा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात तालुका पंचायत व जिल्हा पं२चायत निवडणुक होण्यासाठी पाच वर्षाचा काल ऩिघुन गेला.त्यामुळे गेल्या पाच वर्षाच्या काळात तालुका पंचायत विभागातुन व जिल्हा पंचायत विभागातुन कोणताच विकास साधला नाही. पाच वर्षाचा काल असाच निघुन गेला, त्यामुळे जनतेतुन नाराजी आहे.
मात्र पाच वर्षाच्या कालांतराने राज्यात तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुका पार पाडण्यासाठी सरकारने आरक्षण जाहिर केले.
या आरक्षणात खानापूर तालुक्यात सहा जिल्हा पंचायत विभागातुन पाच उमेदवार हे केवळ महिलावर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.व केवळ एकच जांबोटी जिल्हा पंचायत विभाग सर्व सामान्या साठी राखीव ठेवण्यात आला.
खानापूर तालुक्यातील जांबोटी जिल्हा पंचायत विभाग हा यंदा ही सामान्य गट अऱक्षण आल्याने जांबोटी जिल्हा पंचायती विभागाचे माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई हे यंदा ही निवडणुक लढविण्यास इच्छुक असुन याभागातील कार्यकर्त्याची मागणी नुसार ही उमेदवारी घेऊन जांबोटी जिल्हा पंचायतीचा विकास साधावा.अशा प्रकारची मागणी जांबोटी परिसरातील जांबोटी वडगाव, आमटे, पारवाड, कणकुंबी सारख्या अनेक गावातील कार्यकर्त्यातुन होत आहे.
सन २००५ साली खानापूर तालुक्यातील सर्वात मोठा मतदार संघ ओळखणार्या जांबोटी जिल्हा पंचायतीवर माजी जिल्हा पंचायत सदस्य ,भाजपचे नेते व लोंढ्याचे सुपूत्र बाबूराव देसाई हे मोठ्या मताधिक्याने समितीचा पराभव करत विजय मिळविला.
त्यानंतर भाजपला जांबोटी जिल्हा पंचायतीवर विजय मिळविता आला नाही.म्हणून समितिचा विजय झाला.
तेव्हा माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांची आज ही जांबोटी जिल्हा पंचायतीवर चांगली पकड आहे.
तेव्हा पुन्हा बाबूराव देसाई याना यंदाच्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत तिकीट मिळाले तर याभागातील कार्यकर्ते, नेते त्याच्या विजयासाठी जोमाने लागतील अशी आशा आहे.
माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई हे जांबोटी जिल्हा पंचायत विभागात चांगल्या परिचयाचे आहेत.ते भाजपचे वरिष्ठ नेते आहेत.ते दानशुर व्यक्तित्व असुन ,सयंमी व प्रेमाने ते कार्यकर्त्याशी वागतात.त्याच बरोबर … कार्यकर्त्याच्या आडीअडचणीला धावुन जाणारे व्यक्तीमत्व म्हणून त्याच्याकडे
पाहिल् जाते.
तेव्हा कार्यकर्त्याच्य़ा मागणी नुसार जांबोटी जिल्हा पंचायती वर यंदा ही निवडणुक लढविण्य़ाची तयारी असल्याचे मत माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यानी प्रगट केले