#घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेची माहिती सर्वजनते पर्यत पोहोचविण्याच्या उद्देशाने हुबळी विधुत पुरवठा कंपनी व खानापूर उपविभागाच्यावतीने तीन दिवस सेवा सेतु अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यायोजनेचा लाभ तालुक्यातील प्रत्येक कुटूंबाचे घ्यावा.यासाठी तालुक्यातील प्रत्येक बील कलेक्टरने एका ग्राम पंचायतीत किमत कमी शंभर कुटूंबे तयार करावी.त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतील जवळपास पाच हजार कुटूंबाना सरकारच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळेल.
कारण अलीकडे पावसाचे प्रमाण कमी असल्याने वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. भविष्यात घरी वीजेचा पुरवठा सुरळीत व्हायचा असेल याचा योजनेचा लाभ घ्या. असे आवाहन खानापूर तालु क्या च्या लोकप्रिय आमदारानी गुरूवारी दि.१५ रोजी खानापूरातील हेस्काॅम कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेस्काॅम खात्याचे कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले उपस्थित होते.
यावेळी व्यासमिठावर लेखाधिकारी श्री धरमादास, भाजप नेते प्रमोद कोचेरी,सामाजिक कार्यकर्ते रवी काडगी, सेवा सोलार ग्रुपचे विजय होळणकर, स्टेट बॅकेच्या मॅनेजर आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक लक्ष्मी रंगनाथ यानी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते रोपाला पाणी घालुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी विजय होळणकर, लेखाधिकार लक्ष्मी रंगनाथ व स्टेट बॅक मॅनेजर यानी या योजने बद्दल माहिती दिली.
यावेळी बोलताना हेस्काॅमचे कार्यकारी अभियंते म्हणाले की,या प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना अंतर्गत घराच्या छतावर सौर उर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी पात्र घरगुती वीज ग्राहकाना केंद्र सरकारकडुन अनुदानाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे.यायोजनेची माहिती खानापूर तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरीकाना मिळावी आणि जास्तीत जास्त पात्र ग्राहकाना या योजनेचा लाभ व्हावा.या य़ोजनेचा उद्देश आहे.
याकार्यक्रमातुन जनेतला योजनेची माहिती सौर उर्जा प्रकल्पाचा लाभ,व सरकारच्या अनुदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
घरच्या छतावर सौर उर्जा यंत्रणा बसविल्याने वीजबिलीवरील खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे पात्र घरगुती वीज ग्राहकानी या योजनेची माहिती घेऊन तिचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जावेद नाईकवाडी यानी केले.आभार सिध्दार्थी आंगडी यानी मानले.

