न्यायासाठी कोर्टात जाण्याची #तयारी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील सहा जिल्हा पंचायतीचे आऱक्षण जाहिर होताच तालुक्यातुन आरक्षणाबाबत उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
यंदाच्या खानापुर तालुका जिल्हा पंचायत निवडणीच्या आरक्षणात सहा पैकी चक्क पाच जिल्हा पंचायत विभागात महिलासाठी आरक्षण आल्याने लोंढा जिल्हा पंचायत विभागात अनेक वेळा सामान्य सर्वसाधारण महिला वर्ग असेच आरक्षण आले आहे.यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण आल्याने हा अन्याय झाल्याने गुंजी येथील कार्यकर्ते रामचंद्र मादार यानी याबाबत निवडणुक आयोग , ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव, पालक मंत्री, तसेच बेळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज करणार?
तर खानापूर तालुक्यातील पारिश्वाड. व कक्केरी जिल्हा पंचायत विभागावर अनेक वेळा एस सी ,एस टी आरक्षण येत असल्याने इतर वर्गातील नागरीकातुन नाराजी पसरली आहे.
यासाठी सामाज सेवक यशवंत कोडोळी यानी म्हटले आहे. की ,पारिश्वाड तसेच कक्केरी जिल्हा पंचायत विभागावर केवळ एस सी, एस टी आरक्षण अनेक वेळा आल्याने हा इतर वर्गावर अन्याय झाला आहे.
आरक्षण निश्चित करताना मागील आरक्षणाची स्थिती, आरक्षणाचे चक्रानक्रमाने होणारे फेरवाटप व कायद्यानुसार निर्धारीत नियमाचे पालन करत आरक्षण करने गरजेचे आहे.
या साठी समाज सेवक यशवंत कोडोळी हे सुध्दा अन्यायाविरोध्द याबाबत निवडणुक आयोग , ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव, पालक मंत्री, तसेच बेळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज करणार?