संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कबनाळी, निलावडे,आंबोळी,मुघवडे,
बांदेकरवाडा,कोकणवाडा आदी गावच्या शिवारात हत्तीनी गेल्या आठ,दहा दिवसापासुन उस,भात, केळी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे.
तेव्हा पुन्हा हत्तीचे आगमन होऊन याभागातील पिकांचे नुकसान झाले, तर उपोषन करू.असे आवाहन निलावडे ग्राम पंचायतीचे माजी उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यानी केले .
एवढेच नव्हेतर याभागातील नुकसान झालेल्या ऊस पिकांची साखर कारखाण्यानी गाळप सुरू होताच प्रथम ऊसाची उचल करावी.अशी मागणी केली आहे.
मंगळवारी तालुक्याचे लोकप्रिय आमदारानी कबनाळी येथील शेतकर्याच्या उस, भात व केळी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी आर एफ ओ तेज पी.वाय. तसेच वनकर्मचारी,निलावडे ग्राम पंचायतीचे माजी उपाध्य़क्ष विनायक मुतगेकर,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासुन हत्तीकडुन पिकाच्या झालेल्या नुकसानीचे आमदारानी प्रत्यक्षात भेट देऊन पाहणी केली. हत्तीच्या उपद्रव्यामुळे शेतीचे नुकसान झाले.या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा राजू असे आश्वासन दिले.
याजबरोबर हत्तीकडुन नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी.यासाठीआवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
