#नागरीकांच्या समस्यांचे व तक्रारीचे होणार निवार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील माडीगुंजी परिसरातील जनतेच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निवारण व्हावे.या उद्देशाने कर्नाटक सरकारच्यानिर्देशानुसार
शनिवारी दि.२६ सप्टेंबर प्रजासेवा आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक अडचणी थेट प्रशासनाच्या निर्देशनास आणून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने प्रजासेवा आंदोलन करण्याच्या सुचना सरकारने दिल्या आहेत.
त्यामुळे माडीगुंजी परीसरातील नागरीकाना आपल्या समस्या व तक्रारी मांडण्यांची संधी देण्यात येत आहे.
शनिवारी दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता माडीगुंजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत होणार्या प्रजासेवा आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्य़ाचे आमदार उपस्थित राहणार आहेत.