#पोल्ट्री फार्म एनओसीसाठी लाच मागीतल्याचा आरोप!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका आरोग्याधिकारी डाॅ.
मेहश किवडसन्नावर यानी पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली एन ओ सी देण्यासाठी सात मागीतली.या आरोपावरून लोकायुक्त पथकाने त्यांच्यावर कारवाई केल्याचे उघड झाले आहे.
याबाबतची माहिती अशी की, कामशिनकोप ( ता. खानापूर )येथील निवृत जवान उदय चव्हळी यानी पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी अर्ज केला होता.या कामासाठी आवश्यक असलेली एन ओ सी देण्याच्या मोबदल्यात लाच मागीतल्याची तत्काल त्यानी केली होती.
याची दखल घेऊन या प्रकरणाची तक्रार कदंबा सोशल फाऊंडेशनचे चेअरमन व भाजपचे अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्साल्विस यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.
त्यानंतर त्यानी लोकायुक्ताकडे तक्रार केली होती.या तक्रारीच्या आधारे लोकायुक्त पथकाने कारवाई केल्याची माहिती आहे.
याप्रकरणामुळे खानापूर तालुक्यात शासकीय परवानगी व एन सी ओ प्रक्रियोतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा चर्चित आला आहे.
लोकायुक्त डीएसपी बी एस पाटील यांच्या नेतृत्वा खाली पथकाने कारवाई करताना ६ हजार रूपयाची लाच घेतना पकडले आहे.या कारवाईत पी आय गुरूराज यांच्यासह लोकायुक्त पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
या दरम्यान तालुका आरोग्याधिकारी डाॅ.महेश किवडसण्णावर यांचीही चौकशी सुरू असुन संबधित दोघाना ताब्यात घेऊन कारवाई करण्याचा निर्णय होणार आहे.
या कारवाईमुळे खानापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.