#भाजप कार्यालयात सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका भाजप युवा नेते तसेच खानापूर पीकेपीएस संचालक व सामाजिक कार्यकर्ते शंकर बाळाराम पाटील यांची खानापूर तालुका भाजपच्या प्रवक्तेपदी निवड झाल्या बदल सत्कार सोहळा भाजपच्या कार्यालयात नुकताच करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार उपस्थित होते.
तर व्यासपिठावर खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष,तसेच एम डी सदानंद पाटील, भाजपचे सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, भाजप नेते अँड चेतन मणेरीकर,कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा महा संघाच्या राज्य उपाध्यक्षा सौ धनश्री सरदेसाई,चांगाप्पा निलजकर, भाजपचे प्रधान कार्यदर्शी मल्लापा मारीहाळ ,
माजी नगरसेवक आप्पया कोडोळी आदी उपस्थित होते.
त्याच्या या निवडीबद्दल खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार यानी शाल व पुष्पहार घालुन सत्कार केला व त्यांचे अभिनंदन केले.व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी पक्षसंघटना तसेच सामाजिक क्षेत्रात चांगले कार्य घडो. व त्याच्या नेतृत्वाचा पक्षाला तसेच समाजाला चांगला लाभ होवो.अशी सदिच्छा व्यक्त केली.
