संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
पुण्यामध्ये गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्ण हाणबर समाजाचा स्नेह मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष बालचंद्र चौगुले उपस्थित होते .तर कार्यक्रमाचे नेतृत्व उपाध्यक्ष नारायण गावडे यानी केले. प्रमुख पाहुणे म्हणून तानाजी रघुनाथ नाईक सह जिल्हा निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे डॉक्टर अरविंद तेणागी के एल ई हॉस्पिटल बेळगाव ऍड. रवी शास्त्री सिविल लॉयर इन हायकोर्ट बेळगाव सौ लता नाईक आदर्श शिक्षक पुरस्कृत हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते पाहुणे मंडळीने समाजाबद्दल व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन खूप छान पद्धतीने केले एकता हीच समाजाची शक्ती आणि शिक्षण हेच प्रगतीची गुरुकिल्ली असे मोलाचे मार्गदर्शन मिळाले हा कार्यक्रम पार पडण्यासाठी सभासद कार्यकर्ते व संचालक मंडळ यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम पार पडला श्री नारायण गावडे श्री नागेश पाटील श्री रोहित पाटील श्री रायगौंड चौगुले श्री ज्ञानेश्वर गावडे श्रीशंकर भिमानावार श्री सुनील शिरगावी श्रीमती नंदा पाटील सौ शितल चौगुले सौ गौरी चांदेकर हे उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना शितल चौगुले यांनी मांडली कार्यक्रमाची सूत्रसंचालन व आभार राहुल पाटील व नारायण गावडे यांनी केले.
