#दोन वेळा तारखा देऊन ही सभा पुढे ढकलली!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अति मागासलेला तालुका त्याचबरोबर घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका म्हणून ओळखला जातो.त्यामुळे खानापूर तालुक्याच्या अनेक विविध समस्या जनतेला भेडसावत आहेत.या जनतेच्या विविध समस्यावर तोडगा काढण्यासाठी प्रथमच प्रजासेवा आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्यामुळे खानापूर तालुक्यातील जनता आपल्या समस्या मांडण्यासाठी सज्ज झाली आहे.प्रामुख्याने तालुक्यातील पाणी समस्या बाबत मलप्रभा नदीवरील कुसमळी जवळील पाणी प्रकल्प योजनेतुन मलप्रभानदीचे पाणी बेळगाव तालुक्याला वळवणार ही जनतेची मोठी समस्या,शहरातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे, शहरातील रस्त्याची दुरूस्ती,सरकारी तलावाच्या जागेवरील अतिक्रमण,फिश मार्केट जवळील
रखडलले रस्त्याचे काम,मलप्रभा नदीचे प्रर्दुषण,सरकारी रूग्णालयातील अपुर्या वैद्यकीय सुविधा,जुन्या कोर्ट आवारातील सरकारी जागेचा विकास, मलप्रभा क्रिडांगणाचा विकास,भटक्या जनावरांचा बंदोबस्त,अशा अनेक समस्या खानापूर शहरासह तालुक्यातील जनता मांडण्याच्या तयारी असताना
या कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी दि.५ सप्टेंबर रोजी खानापूर लोकमान्य भवनात करण्याचे नियोजन करण्यात आले.परंतु काही कारणास्त प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रम पुढे ढकलला व बुधवारी दि.९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला.
बुधवारचा प्रजा सेवा आंदोलन कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलला आहे.
त्यामुळे खानापूर शहरासह तालुक्यातील जनता आश्चर्य व्यक्त करत आहे. हा कार्यक्रम पुढे ढकलण्याने काय साध्य होणार आहे.कधी ही कार्यक्रम घेतला तरी जनता आपल्या समस्या नक्कीच मांडणार त्याना समर्पक उत्तर द्यावीच लागणार?
