
#बुधवारच्या सर्वसाधारण बैठकीत १ वर्षाच्या कालावधीसाठी निवड!
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर नगरपंचायतीची सर्वसाधरण बैठक बुधवारी दि १८ रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी प्रकाश बैलूरकर होत्या.तर व्यासपिठावर उपनगराध्यक्षा सौ जया भुक्ती तसेच नवनिर्वाचित स्थायी कमिटी चेअरमन आपय्या कोडोळी होते.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत चीफ आँफिसर संतोष कुरबेट यानी केेले.
यावेळी बैठकीत स्थायी कमिटीच्या नुतन चेअरमन पदाची निवड,तसेच १५व्या वित आयोगातील सन २०२६-२६ या वर्षासाठी स्विकारण्यात आलेल्या कामासाठी केपीपीपी पोर्टल मागण्यात आलेल्या कामाना मंजुरी,सन २०२५ -२६ यावर्षासाठी एस एफ सी ओपन ग्रॅट अंतर्गत स्विकारलेल्या कामाना मंजुरी देण्याबाबत चर्चा,तसेच दिव्यांगाना शिलाई मशीन देण्यासाठी लाभार्थीची निवड करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी नगरसेवक विनायक कलाल यानी नगरोत्थान योजनेतुन मठ गल्ली ते स्वामी विवेकानंद हायस्कूल पर्यतच्या गटारी तसेच न्यू निंगापूर गल्लीतील फेव्हर्स मंजुर होऊन दीड वर्षे झाले कंत्राटदाराने कामाची पाहणी करून कामाचा पत्ता नाही.त्यामुळे नागरीकांची वारंवार तक्रारी वाढल्या आहेत. त्या कामाची सुरूवात करा.अशी मागणी केली.
यावेळी नगरसेवक मझहर खानापूरी यानी दादोबा नगरात रस्ते गटारी करण्याची मागणी केली असता नगरपंचायचीकडे निधी नसल्याचे कारण पुढे केले.
यावेळी नगरसेवक हणमंत पुजारी यानी स्थायी कमिटीच्या चेअरमनच्या निवडीसाठी आम्हाला विश्वासात न घेताच आमच्या सह्या न घेताच चेअरमनची निवड केल्याच्या नाराजीतुन नगरसेवक हणमंत पुजारी बैठकीतुन उठून गेले.
दिव्यांगाना शिलाई मशीन देण्यासाठी १२ पैकी ७ लाभार्थ्याची निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला नगरसेवक प्रकाश बैलुरकर, लक्ष्मण मादार,विनायक कलाल,नारायण ओगले,नारायण मयेकर, हणमंत पुजारी,मझहर खानापूरी,विनोद पाटील,महमदरफिक वारेमनी. तसेच नगरसेविका सौ राजश्री तोपिनकट्टी,सौ.मेघा कुंदरगी,सौ लता पाटील,सौ.लक्ष्मी अंकलगी,फातीमा बेपारी ,साहेरा सनदी,
त्याचबरोबर अभियंते तिरूपती ,गंगाधर कांबळे, सुहास गुरव इतर कर्मचारी उपस्थित होते.आभार प्रेमानंद नाईक यानी मानले.