खानापूर प्रतिनिधी

चापगाव ( ता.खानापूर येथील )श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. प्रमोद कोचेरी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पूजेनंतर उपस्थित भक्तांना मार्गदर्शन करताना श्री. प्रमोद कोचेरी यांनी श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला व आजच्या युवकांनी श्रीकृष्णाच्या आदर्शांचे पालन करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती होती
यावेळी चापगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक व बाळ-गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराला फुले आणि आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते.
कार्यक्रमाचे आयोजन चापगाव ग्रामस्थ व श्रीकृष्ण मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले होते. शेवटी महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.