शनिवारी दि.५ सप्टेंबर ऐवजी शनिवारी दि.९ सप्टेंबर !
नागरीकांच्या समस्यांचे व तक्रारीचे होणार निवारण !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूरात शनिवारी दि ५ सप्टेंबर रोजी होणारे प्रजासेवा आंदोलन पुढे ढक ले असुन शनिवारी दि.९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.
खानापूर तालुक्यातील जनतेच्या विविध तक्रारी तसेच समस्यांचे निवारण व्हावे.या उद्देशाने कर्नाटक सरकारच्यानिर्देशानुसार
सप्टेंबर महिण्यातील प्रत्येक शनिवारी प्रजासेवा आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील चार ठिकाणी होणार्या बैठकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
सार्वजनिक अडचणी थेट प्रशासनाच्या निर्देशनास आणून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने दर प्रजासेवा आंदोलन करण्याच्या सुचना सरकारने दिव्या आहेत.
त्यामुळे खानापूर तालुक्यातील नागरीकाना आपल्या समस्या व तक्रारी मांडण्यांची संधी देण्यात आहे.
*शनिवारी दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता लोकमान्य भवन सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशीच्या दि.९ सप्टेंबर रोजीच्या खानापूर लोकभवनात होणार्या प्रजासेवा आंदोलनाला पालक मंत्री सतीश जारकिहोळी अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
तर इतर प्रजासेवा आंदोलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार उपस्थित राहणार आहेत.
